सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको मालिकेची क्रेझ आहे. ह्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहे. मालिकेतील गुरुनाथ सुभेदार त्याची बायको राधिका सुभेदार व शनया हि कार्यक्रमातील प्रमुख पात्रे, याव्यतिरिक्त राधिकाची मैत्रीण रेवती, गुप्ते, नाना, नानी. गुरुनाथचा मित्र आनंद यांसारखी बरीच पात्रे आपल्याला मालिकेत पाहायला मिळतात. त्यातील काही कलाकारांची आणि त्यांच्या रियल लाईफ बद्दल जाणून घेऊयात.

गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजीत खांडकेकर बद्दल जाणून घेऊयात – ७ जुलै १९८६ रोजी पुण्यात जन्म झाला. अभिजितच शालेय आणि कॉलेज शिक्षण पुण्यातच झालं. झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात त्याने एन्ट्री केली आणि फायनलही गाठले. त्यानंतर त्याने झी मराठीवर अनेक अवॉर्ड शो साठी अँकरिंग केले, त्यानंतर झी मराठीनेच त्याला “माझिये प्रियेला प्रीत कळेना” ह्या मालिकेसाठी लीड रोल ची भूमिका दिली. अवधूत गुप्तेनी त्याला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या फिल्म मधेही काम करण्याची संधी दिली. सध्या तो “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका आणि “पती गेले ग कोठेवाडी” हे नाटकही करतोय. त्याच्या पत्नीचे नाव सुखद खांडकेकर असं आहे. ती एक उत्कृष्ट कत्थक डान्सर आहे. बऱ्याच लाइव्ह शो मध्ये तिने तिची अदाकारी सादर केली आहे. या दोघांचं कॉलेज जीवनापासूनच प्रेम होत. सध्या ते नवी मुंबईत स्थायिक आहेत.

राधिका सुभेदार म्हणजेच अनिता दाते – जन्म ३१ ऑक्टोबर १९८० साली नाशिक येथे झाला. बऱ्याच हिंदी आणि मराठी मालिकांत (बालवीर, भाई भैया और ब्रदस, अग्निहोत्र, मंथन, अनामिका, एका लग्नाची तिसरी गोस्ट, माझ्या नवऱ्याची बायको) नव्हे तर अनेक सिनेमेही तिने केलेत(कॉफी आणि बरच काही, अय्या, आजोबा, जोर लगाके हैय्या, अडगळ माडगूळ, सनई चौघडे, जोगवा) अश्या चित्रपटात हि काम केलं. तिच्या पतीचे नाव चिन्मय केळकर असे आहे. ते मराठी चित्रपट सृष्टीत काम करतात. त्यांना फोटोग्राफीची आवड आहे.

रेवती म्हणजेच श्वेता मेहेंदळे – सुप्रसिद्ध कलाकार राहुल मेहेंदळे यांच्या या पत्नी. ६ ऑक्टोबर १९७८ साली तिचा जन्म झाला. “ह्या गोजिरवान्या घरात” ह्या मालिकेत काम करतानाच त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगाही आहे त्याच नाव आर्य मेहेंदळे. तिने बरेचसे मराठी चित्रपटही केलेत (सगळं करून भागलं, पाच नार एक बेजार, असा मी तास मी, जावई बाप्पू झिंदाबाद) तर असावा सुंदर स्वप्नांचा बांगला हि त्यांची सुपरहिट मालिका.

श्रेयश म्हणजेच सचिन देशपांडे – नुकताच सचिन देशपांडे आणि पियुशा बिन्दूर यांचा साखरपुडा झालाय, सचिनने बेबी डॉल, माझी आई तिचा बाप, ती दोघ अश्या बऱ्याच नाटकांत काम केलय तसेच माझे पती सौभाग्यवती हि मालिका आणि नुकताच रिलीज झालेला कच्चा लिंबू या चित्रपटांत काम केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *