“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर

नुकतीच शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनिल मालिकेतून एक्झिट घेत असल्याची बातमी हाती लागली होती. यामुळे आता शनयाची भूमिका कोण साकारणार हे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर नव्याने निर्माण झाले होते. खरं तर रसिका सुनील हिच्या अभिनयाने गाजवलेली शनया प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी तितकीच दमदार अभिनेत्री उभे करणे हे एक आव्हानच होते. परंतु आता या भूमिकेसाठीचा पडदा हटला असून या भूमिकेसाठी चक्क जय मल्हार मालिकेची अभिनेत्री “बानू” म्हणजेच ईशा केसकर हिच्या नावाची वर्णी लागली आहे.

credit by Yogesh golande photography

ईशाने साकारलेली दमदार “बानू” तुम्ही याआधी पाहिलीच असेल. त्यामुळेच शनयाची भूमिका ती तितक्याच नेटाने सांभाळेल असा विश्वास सर्वाना वाटत आहे. रसिका सुनील ने या मालिकेतून काही खाजगी कारणाने एक्झिट घेतली असल्याने तिला ही मालिका सोडावी लागली आहे.
परंतु काही अवधी नंतर ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर उभी राहील असा विश्वास तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. खरं तर शनया म्हणजेच रसिका सुनील असे समीकरण प्रेक्षकांच्या मनात तयार झाले होते त्यामुळे ईशा केसकर या भूमिकेला किती न्याय मिळवून देणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढे काय होणार हे आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही त्यामुळे पुढील भाग पाहूनचईशा केसकर हिच्या अभिनयाबद्दल बोलणे योग्य ठरेल

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *