माझा छकुला चित्रपट प्रेक्षक आजही आवर्जून पाहतात. महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, निवेदिता जोशी, मेधा कांबीकर, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आणखीन एक चेहरा पाहायला मिळाला तो म्हणजे महेश कोठारे यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “हेमांगी खोपकर” हीचा. रायगड जिल्ह्यातील पेण सारख्या छोट्या शहरात “हेमांगी खोपकर” हीचा जन्म झाला आई वडील दोघेही नोकरी करत. इथेच हेमांगीचे शालेय तसेच कॉलेजचे शिक्षण झाले. आठवीत असताना गावातील एका कार्यक्रमात “रायगडाला जेव्हा जाग येते” या नाटकात राजाराम राजे साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेचे गावच्या लोकांनी खूप कौतुक केले इथूनच पुढे तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. मग जिल्हा, राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका गाजवून अनेक बक्षिसे मिळवली.

१२वी त शिकत असताना प्रभाकर पणशीकर यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी त्यांनी नाटकात येसूबाईच्या भूमिकेबद्दल विचारले परंतु शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय नाटक करायचे नाही या निर्णयामुळे घरच्यांनी नकार कळवला. बी कॉम झाल्यावर मुंबईतील ‘बनारस सिल्क हाऊस’ ची जाहिरात मिळाली यात वर्षा उसगावकर, जयश्री गडकर यांच्यासोबत झळकण्याची संधी मिळाली. यात हेमांगीला केवळ दोनच शब्द बोलायचे होते. साधारण संध्याकाळच्या बातम्यांच्या १० मिनिटं अगोदर ही जाहिरात टीव्हीवर येत होती त्यावेळी तिची झलक पाहण्यासाठी पेण मधील तिचे चाहते टीव्ही समोर अर्धा अर्धा तास अगोदर बसत होते. यानंतर ‘इथे नांदतो बाळू’ ही पहिली मालिका तिला मिळाली.
माझा छकुला चित्रपटात काम करणारी हि सुंदर अभिनेत्री खरोखरंच महेश कोठारे यांची पत्नीचं आहे असं लोकांना वाटायचं, त्याच कारणही तसेच आहे एकतर त्यांनी चित्रपटात खरोखर आपल्या मुलाला घेतलं आणि चित्रपटात नाव हि इन्स्पेक्टर महेश तर मुलाचं आदिनाथ असं होत. ह्यामुळेच हीच महेश कोठारे यांचीच पत्नी असावी असा लोकांचा गैरसमज व्हायचा.

मराठीतील प्रसिद्ध जोडी उमा आणि प्रकाश भेंडे यांनी तिला ‘आपण यांना पाहिलंत का’ या चित्रपटात काम दिले. माहेरची सावली, सारेच सज्जन, एप्रिल फुल हे चित्रपट तसेच अग्निपरीक्षा, अग्निसाक्षी अशा मालिकाही मिळत गेल्या. महेश कोठारे दिग्दर्शित ‘माझा छकुला’ मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली परंतु याच दरम्यान तिचे विनोद राव यांच्यासोबत लग्न जुळले. लग्नानंतर काही दिवसातच आजारी पडल्याने शूटिंग पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे नाईलाजास्तव हा रोल कमी करण्यात आला. मिहीर आणि कश्मिरा यांच्या जन्मानंतर पुन्हा नव्याने ‘अपराध मीच केला’ नाटकात प्रमुख भूमिका मिळाली. ‘ काय करू न कसं करू ‘ याची निर्मिती केली. पती अगोदरच या क्षेत्रात असल्याने हवी ते काम करण्याची मुभा मिळाली. हेमांगी यांच्या नणंद सुनीता राव यादेखील हिंदी सृष्टीतील जाणत्या कलाकार त्यामुळे अभिनय करण्यास कुटुंबियांकडूनही कुठलीच बंदी नव्हती. पण त्या सध्या काय करतात असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. “हेमांगी खोपकर” ह्या अजूनही मराठी रंगभूमीवर कामे करताना पाहायला मिळतात “मी माझे मला” ह्या नाटकात त्यांनी रवी पटवर्धन यांच्यासोबत काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *