महेश कोठारे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले “तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है” हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली.

“प्यार किये जा” या चित्रपटाचं मराठीत रिमेक महेश कोठारेना करायच होत. सर्व पात्रांची जुळणी झाली पण मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी त्यांना पात्रच मिळेना. त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होत “झोपी गेलेला जागा झाला” नाटकाचे हजारो प्रयोग झालेले, नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचं निधन झालं. बबन प्रभुणे यांच्या जागी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड झालती. महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिलं तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका इतकी आवडली कि त्यांनी मेहमूदच्या भूमिकेसाठी त्याची निवड केली. महेश कोठारेंचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यानी लक्ष्मीकांतशी ह्या चित्रपटा संदर्भात चर्चा केली आणि चित्रपटासाठी त्याचा होकार मिळवला. महेश कोठारेंनी लगेच खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्मीकांतला दिला. होय त्या फक्त एका रुपयातच त्यांनी हा चित्रपट केला त्याच नाव होत “धुमधडाका”. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्ड्यांनी काम केले आहे. बेर्डे हे फक्त चांगले कलाकाराच नव्हते तर त्यांची माणुसकीही महेशला भाळली स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिल्या.

महेशला लक्ष्मीकांत यांची भूमिका इतकी आवडली कि त्याच्या प्रत्येक चित्रपटात लक्ष्मीकांत असायचाच. पुढे त्यांनी झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे एक चढ एक चित्रपट केले. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांचं निधन झालं, आणि मराठी चित्रपट सृष्टी ढासळली. मराठी सिनेजगत त्याच्या जाण्यातून सावरली नाही, तब्बल ६ वर्ष मराठी सिनेसृष्टीतला एकही चित्रपट गाजला नाही. रवी जाधवचा नटरंग २००९ साली आला आणि पुन्हा लोक मराठीकडे वळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *