मायबाप रसिकांनी कलाकारांचे कौतुक करावे हाच त्या कलाकाराचा प्रयत्न असतो. परंतु हेच चाहते जेव्हा आपली मर्यादा सोडून त्या कलाकाराच्या प्रेमात आकंठ बुडताना दिसतात त्यावेळी ही गोष्ट त्या कलाकाराला त्रासदायक ठरू शकते. असेच काहीसे मराठी अभिनेता संग्राम समेळ याच्याबाबत झालेले पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून संग्राम समेळ या कलाकाराला त्याच्या महिला फॅन कडून नाहक त्रास होत असल्याची पोस्ट त्याने फेसबुकवर लाईव्ह येऊन शेअर केली आहे. तो म्हणतो…

आज अचानक लाईव्ह येण्यामागचे कारण थोडेसे नाजूक आहे…मायबाप रसिकांनी आपले कौतुक करावे हाच आमचा प्रयत्न असतो आणि ते मिळवण्यासाठीच आमची धडपड चालू असते पण या गोष्टीची मर्यादा जेव्हा ओलांडली जाते तेव्हा या गोष्टीचा मनस्ताप व्हायला लागतो. गेल्या काही महिन्यांपासून मला हा त्रास होतोय, मला माहित नाही ही पोस्ट मी लाईव्ह करायला हवी की नाही, पण योग्य ती ऍक्शन मी माझ्याकडन घेतल्याने माझ्याकडे काहीच पर्याय उरत नाहीये, म्हणून मी ही पोस्ट लाईव्ह करतोय…एक मुलगी आहे जीच नाव आहे ‘स्वीटी’, ती मला दिवसाला साधारण ३५० ते ४०० मेसेजेस पाठवते वेगवेगळ्या नंबर वरून… आणि असं करायची वेळ आली मला आज कारण जेव्हा तुमची फॅमिली लाईफ ,म्यारीड लाईफ अफेक्ट व्हायला लागते या गोष्टींमुळे… तेव्हा दुसरा काही पर्याय उरत नाही. मी लाईव्ह येण्यामागे कारण हेच आहे की मला तुम्हाला एक अपील करायचंय, कोणी त्या मुलीच्या परिचयाचे असतील, तिचे नातेवाईक असतील तर ही पोस्ट त्यांच्यापर्यत गेली असेल तर तुम्ही प्लिज त्या मुलीला समजवा…माझे सर्व प्रयत्न संपलेले आहेत मला काय करावं ते समजत नाहीये, तुम्ही जर मदत केली तर मी या प्रॉब्लेममधून सुटू शकेल. तुम्हाला जेन्युअन अपील आहे ही पोस्ट त्या मुलीच्या घरच्यांपर्यत पोहोचवली तर ते तिला समजावून सांगतील, एका चांगल्या मुलीच नुकसान होणार नाही असं वेड्यासारख वागून…आणि मलासुद्धा तुमची मदत होईल…त्या मुलीचं नाव आहे “स्वीटी सातारकर”.
ही संग्राम समेळची पोस्ट त्याची पत्नी पल्लवी पाटील- समेळ हिनेही शेअर करून चाहत्यांकडून मदतीचे आवाहन केले आहे. जेणेकरून त्या मुलीचेही नुकसान होणार नाही आणि आम्हीही यातून सुखरूप बाहेर पडू. एवढी एक माफक अपेक्षा त्यांनी चाहत्यांकडून ठेवली आहे. खरं तर कलाकार म्हटले की चाहते हे आलेच परंतु असे चाहते जर त्यांच्या खाजगी आयुष्यातही डोकावत असतील, आपली मर्यादा ओलांडत असतील तर त्याचा त्रास हा त्या कलाकाराला निश्चितच होत असतो… ही एक खेदाचीच बाब म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *