महाराष्ट्र गारठला तब्बल २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला या जिल्ह्याने

सध्या सगळा महाराष्ट्रच थंडीने कुडकूडायला लागला आहे. थंडीचा कडाका एवढा वाढलाय की दिवसाही लोक स्वेटर,मफलर शिवाय बाहेर पडत नाहीत. संध्याकाळच्या वेळी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. गेली दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात आणखी घट होताना दिसत आहे.
धुळे जिल्ह्यातील थंडीने तर २७ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. १९९१ साली ३ जानेवारी रोजी हे तापमान २.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. परंतु आजचे तापमान २.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे पानांवर साचलेले दव अक्षरशः गोठू लागले आहेत. धुळ्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातही चांगलाच गारवा जाणवतोय. हा गारठा आजून वाढण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *