काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरु झालेली “झिंग झिंग झिंगाट” ह्या मालिकेच्या सेटवर काल भीषण आग लागली. शूटिंग सुरु असताना स्टुडिओत लाईटच्या शॉक सर्किटमुळे हि आग लागली. मालिकेचे शूटिंग चेंबूर येथील एस्सेल स्टुडिओमध्ये सुरु असताना हि आग लागली असल्याचे समजते. त्यावेळी स्टुडिओत आदेश बांदेकर यांच्या सोबत आणखीन ७० ते ८० जण असल्याचे सांगितले जातेय. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे उघड झाले आहे.

स्टुडिओत आग विझवण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध असल्याने तातडीचे उपाययोजना काण्यात आले त्यामुळे हि आग लवकरात लवकर आटोक्यात आणली गेली. “झिंग झिंग झिंगाट” हा नव्याने सुरु झालेला गाण्याच्या अन्ताक्षरीचा हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कायक्रमाचे चित्रीकरण चालू असतानाच सेटच्या वरील बाजूस आगीचे लोट पाहायला मिळाले, आणि सेटवर एकच गोंधळ उडाला.
मागील वेळेसही दुधी भोपळ्याचा जूस पिल्याने त्यांना विषबाधा झाली होती त्यातून ते कसेबसे बचावले होते. या पूर्वीही २ वेळेस त्यांच्या कारचा भीषण अपघात झालेला आणि सुदैवाने त्यातूनही ते बचावले होते. एकामागून एक त्यांच्यावर आलेली संकटे यातून त्यांच्यावर जीव लावणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच ते बचावले असल्याचे त्यांनी सांगितले. आत्ताही त्यांनी एका मुलाखतीत या घटनेची माहिती देताना रसिक प्रेक्षांच्या प्रेमामुळेच आपण बचावल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *