mahabharat actor

दूरदर्शन वाहिनीने महाभारत ही मालिका पुनःप्रक्षेपीत केली आहे त्यात कर्णचा वध करण्यात आला त्यावेळी एका सर्वशक्तीशाली योध्याचा असा अंत झाला म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. १९८८ साली प्रदर्शित होत असलेल्या ह्या मालिकेचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांनी केले होते. मालिकेतून कर्णची भूमिका अभिनेते “पंकज धीर” यांनी साकारली होती. आपल्या दमदार अभिनयातून पंकज धीर यांनी तितक्याच ताकदीचा कर्ण प्रेक्षकांसमोर उभा केला होता. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

pankaj dheer actor in mahabharat
pankaj dheer actor in mahabharat

पंकज धीर हे बॉलिवूडचे अभिनेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी बहुतेक खलनायकी ढंगाच्या भूमिका बजावलेल्या पाहायला मिळतात. सनम बेवफा, सौगंध, जागृती, आशिक आवरा, अंदाज, रिश्ते , टारझन द वंडर कार अशा अनेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. चंद्रकांता, महाभारत, कानून, युग अशा काही हिंदी मालीकेतूनही ते प्रेक्षकांसमोर आले. २०१४ साली ‘माय फादर गॉडफादर’ चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले. पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीर, बॉलिवूड अभिनेता निकीतीन धीर हा त्यांचा मुलगा. चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील तंगबलीच्या खलनायकी भूमिकेमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. मिशन इस्तंबूल, रेडी, दबंग २, हाऊसफुल ३ असे बॉलिवूड चित्रपट आणि काही हिंदी टीव्ही मालिकाही त्याने अभिनित केल्या आहेत. निकीतीन धीर अभिनेत्री कृतिका सेनगर हिच्यासोबत २०१४ साली विवाहबद्ध झाला. पुनर्विवाह, क्यूँकी सांस भी कभी बहू थी, झान्सी की राणी या हिंदी मालिकेतून कृतिका सेनगर हिने मध्यवर्ती भूमिका बजावलेल्या पाहायला मिळाल्या. पंकज धीर यांनी दिग्दर्शित केलेल्या माय फादर गॉडफादर या चित्रपटातुन तिने महत्वाची भूमिका बजावली होती.

actress krutika
actress krutika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *