महाजनी काकूंची मुलगी आहे संभाजी मालिकेतील हि सुंदर अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत राधिका वर होणारा अन्याय आणि ती त्याला कश्याप्रकारे सामोरे जाते हे दाखवण्यात आले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत महाजनी काका आणि काकू राधिकाच्या नेहमीच पाठीशी उभे असलेले पाहिले. आपला मुलगा आपल्यापासून दूर परदेशात राहतो आणि तो आता आपल्याला विसरलाय ह्यामुळे ते राधिकेलाच आपली मुलगी समजतात. या महाजनी काकूंची भूमिका निभावली आहे “कांचन गुप्ते” यांनी. कांचन गुप्ते या मराठी नाट्य सृष्टीतील कलाकार म्हणून ओळखल्या जातात. कांचन गुप्ते यांचे बालपण मुंबईत गेले.

वि पी एम हायस्कुल मधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. महाविद्यालयात शिकत असताना पहिल्यांदा “पद्मश्री धुंडिराज” हे नाटक साकारले. यानंतर नाट्य क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. याचदरम्यान काही काळ त्यांनी स्टेट बँकेत नोकरीही केली. शुभं भवतु सारखे चित्रपट आणि घाडगे अँड सून, जावई विकत घेणे आहे सारख्या अनेक मालिकेत भूमिका साकारल्या. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांना महाजनी काकुंचि भूमीका मिळाली आणि त्यांनी ती तितक्याच नेटाने सांभाळली. कांचन गुप्ते यांची मुलगी याच क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचे लग्ना पूर्वीचे नाव पूर्वा गुप्ते. केदार गोखले यांच्यासोबत पूर्वा ने लग्नगाठ बांधल्यानंतर तिची ओळख “पूर्वा गोखले” अशी झाली. केदार गोखले हे बिजनेसमन म्हणून ओळखले जातात.

पूर्वा गोखले हिने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत ‘राणी सईबाई’ ची भूमिका निभावली होती. तिची झी टीव्ही या हिंदी वाहिनीवर “तुझसे है राबता” ही मालिका चांगलीच गाजत आहे. याआधीही तिने कहाणी घर घर की, कोई दिल में है सारख्या निवडक हिंदी मालिका गाजवल्या आहेत. “कुलवधू” या मराठी मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती. “सेल्फी” हे नाटक साकारून नाट्य क्षेत्रातही तिने काम केले आहे. पूर्वा गोखले आणि केदार गोखले याना दोन मुली आहेत हे सर्व कुटुंब मुंबईत स्थायिक आहे. कांचन गुप्ते आणि पूर्वा गोखले या दोघी मायलेकींना पुढील वाटचालिसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *