“मला मुलाचं लग्न पाहायचंय” विजय चव्हाणांची शेवेची इच्छा .. .. म्हणून मुलगा वारदणे उरकून घेतला काही महिन्यापूर्वीच साखरपुडा

नुकतेच मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजय चव्हाण यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा जाण्याने केवळ सिने सृष्टीनेचं नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती. अशोक सराफ यांनी तर आपला चांगला मित्र गमावल्याचे दुःख व्यक्त केले होते. विजय चव्हाण यांनी साकारलेली ‘मोरूची मावशी’ अजरामर राहील अशी भावना भरत जाधव याने व्यक्त केली. यापूर्वीही विजय चव्हाण त्यांना अनेक दिवस फुफ्फुसाच्या आजारामुळे दवाखान्यात नेण्यात आलेलं.

विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण यांनी त्यांची अखेरची ईच्छा अपूर्ण राहिली असल्याचे स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वीच वरदचा साखरपुडा प्रज्ञा गुरव हिच्यासोबत झाला होता. परंतु विजय चव्हाण यांच्या शारीरिक अस्वस्थ मुळे हे लग्न डिसेंबर मध्ये ढकलण्यात आले. मुलाचे लग्न पाहायची त्यांची हि इच्छा अपूर्णच राहिली. विजय चव्हाणांच्या इच्छे मुळेच त्याने हा साखरपुडा लवकरात लवकर उरकला. प्रज्ञा हि एका खासगी कंपनीत (Lionbridge) काम करते. प्रज्ञाच संपूर्ण कुटुंब विजय चव्हाण याच्या जाण्याने त्यांच्या दुःखात सामील झालेले पाहायला मिळाले.
मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं फुफ्फुसाच्या आजाराने निधन. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार हरपल्याने अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या भावना सोशिअल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. मनमुरादपणे हसवणाऱ्या बहुगुणी आणि बहुरूपी व्यक्तिरेखा साकारणारा ह्यापेक्षा चांगला कलाकार मराठी सृष्टीला लाभणार नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *