actor news

प्रसिद्ध अभिनेते “अविनाश खर्शीकर” यांचे आज सकाळी 10.30 वाजता आपल्या राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. अविनाश खर्शीकर यांनी १९७८ सालच्या ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे मराठी सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार, माहेरची पाहुणी, माझा नवरा तुझी बायको, श्री शशी देवधर, चमत्कार, माझा छकुला असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने साकारले होते.

marathi actor avinash
marathi actor avinash

९० च्या दशकात अशोक सराफ ,लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, विजय कदम अशा विनोदी कलाकारांसोबत त्यांनीही आपल्या विनोदी अभिनयाची झलक दाखवून दिली होती. सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अवघ्या मराठी सृष्टीत शोककळा पसरली आहे. विनोदी भूमिका असो वा गंभीर भूमिका त्यांनी त्या आपल्या अभिनयातून प्रेक्षकांसमोर मांडल्या त्याचमुळे त्यांच्या जाण्याने त्यांचा चाहता वर्ग देखील खूपच भावुक झाला आहे. चित्रपट कोणताही असो आणि रोल कोणताही तो त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर उंच शिखरावर नेवून ठेवला त्यामुळेच रोल छोटा असला तरी प्रत्येक नाटकात आणि चित्रपटात त्यांनी आपला ठसा उमठवलेला पाहायला मिळाला. अविनाश खर्शीकर यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *