मराठी “बिग बॉसच्या” दुसऱ्या पर्वात ह्या कलाकारांची एन्ट्री…ह्या सिजन मध्ये येणार आणखी धमाल

कलर्स मराठीवरील बिग बॉसला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ह्याचा पहिला सिजन तुफान हिट ठरला होता. त्यामुळे लवकरच कलर्स वाहिनीने दुसऱ्या सिजनची जोरदार तयारी सुरू केलेली दिसते. बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये मेधा धाडे हिने विजेतेपद पटकावले होते. तिच्या सोबत राजेश शृंगारपुरे, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, जुई गडकरी, सुशांत शेलार, आस्ताद काळे ह्या सर्वांनी हजेरी लावली होती. सर्वांनी आपापल्या परीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले तर काहींचे वागणे प्रेक्षकांना मुळीच रुचले नाही. त्यामुळे आणखी एकदा ह्या शोचा सिजन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये ” राधा प्रेमरंगी रंगली ” मालिकेतील तुमचे आवडते कलाकार हजेरी लावणार असल्याचे समोर येत आहे. ही मालिका लवकरच आटोपती घेत असल्याने मालिकेतील बरेच कलाकार ह्या शोचा भाग बनणार असल्याचे समजते. शैलेश दातार, गौतम जोगळेकर, वीणा जगताप, अर्चना निपाणकर यासोबत अक्षया गुरव ह्या कलाकारांची नावे समोर येत आहेत. महेश मांजरेकर ह्यांनी बिग बॉसची सूत्रे हाती घेतली होती मात्र ह्यावेळी ही सूत्रे कोण सांभाळणार हे अजून समोर आलेले नाही. त्यामुळे ह्या दुसऱ्या सिजनची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली पाहायला मिळत आहे. ह्यासाठी चॅनलवरील काही लोकप्रिय मालिकांच्या प्रक्षेपणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
नुकतंच आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग हि सुरु होणार आहे त्यामुळे कदाचित बिग बॉस मराठीच्या ह्या दुसऱ्या सिजनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण च्यायनलने आयपीएलचा आमच्या बिग बॉस वर काहीही परिणाम होणार नाही आणि पहिल्या सीजन प्रमाणेच हाही सीजन सांगलंच गाजेल अशी आशा व्यक्त केली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *