मराठी बिगबॉस मधून बाहेर पडल्यानंतर ही अभिनेत्री साकरतेय “हॉरर मालिका”

कलर्स मराठी वरील बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री जुई गडकरि पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. बिग बॉस च्या घरात जुईला आपला फारसा जम बसवता आला नाही तरी देखील तिने या घरात चांगलाच तग धरून ठेवला हे सगळ्यांनीच अनुभवले. मास मीडिया मधून शिक्षण घेऊन जुईने मुंबई युनिव्हर्सिटी तर्फे गोल्ड मेडलही मिळवले आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रशिक्षणासोबत तिने कथकमध्ये देखील प्राविण्य मिळवले आहे. एवढेच नाही तर कृष्ठरोगी असलेल्या पीडितांसाठी ‘शांतीवन एनजीओ’ मार्फत ती त्यांची मदत देखील करत आहे. जुई गडकरी ही प्राणिप्रेमी आहे हे सगळेचजण जाणता. तिच्या घरीदेखील अनेक मांजर तिने पाळले आहेत.

कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर जुईने सहाययक दिग्दर्शिकेची भूमिका निभावली होती. परंतु अभिनयाचे वेध लागले आणि स्टार प्रवाहवरील “पुढचं पाऊल” मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तिने साकारलेली “कल्याणी” प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. वाहिनीवर बराच काळ या मालिकेने तग धरून ठेवला होता. त्यानंतर तिने कलर्स मराठीवरील “सरस्वती” मालिकेत देविका साकारली.
बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर आता जुई गडकरी झी युवा वरील “वर्तुळ” मालिका साकारत आहे. येत्या १९ नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री ९ वाजता प्रक्षेपीत होणार आहे. “वर्तुळ” ही एक हॉरर मालिका असल्याने प्रेक्षकही या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. जुई गडकरी सोबत गडबड झाली चित्रपट अभिनेता विकास पाटील या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तेव्हा जुईला तिच्या या नव्या मालिकेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा !…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *