मराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला

पद्मा चव्हाण या मराठी नाटक, चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील पाऊल टाकून आपले नाव कमावले होते. ७ जुलै १९४७ रोजी पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला. स्त्री सौंदर्याचा अनोखा नमुना म्हणून त्यांची ख्याती होती. रंगभूमी गाजवताना त्यांच्या प्रेत्येक नाटकात नावाच्या पुढे ” मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब ” असे छापले जायचे. बायकोला जेव्हा जाग येते, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल, म्हणून मी तुला कुठे नेत नाही, मवाली, सासरेबुवा जरा जपून यासारखी नाटके त्यांनी सादर करून आपल्या अभिनयाची छाप पाडली.

कुलदीप पवार, अशोक सराफ, रवींद्र महाजनी यांच्यासोबत त्यांनी गुपचूप गुपचूप, जावयाची जात, देवघर, सासू वरचढ जावई, तूच माझी राणी, अष्टविनायक हयासारखे चित्रपट साकारले. “सासू वरचढ जावई” चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांच्या सासूची भूमिका चोख बजावली. सासू जावई मधील वरचढपणा प्रेक्षकांना मनमुराद हसविण्यात यशस्वी ठरला. गुपचूप गुपचूप मधील त्यांनी साकारलेली ‘मिस जवळकर’ त्यांनी सुरेख निभावली होती. याखेरीज त्यांनी करवा चौथ, कश्मीर की कली, बिन बादल बरसात सारखे हिंदी चित्रपट साकारले.
१२ सप्टेंबर १९९६ रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले.पद्मा चव्हाण यांचे लग्न झाले की नाही याबाबत माहिती नसली तरी एका लेखकाने त्यांच्यासोबत आपले नाव जोडले होते याबाबत पद्मा चव्हाण यांनी त्यांना कोर्टात देखील खेचले असल्याचे बोलले जात होते.सोशल मीडियावर पद्मा चव्हाण यांना सर्च केले असता लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी “रुही बेर्डे” यांच्या फोटोची वर्णी लागते. पद्मा चव्हाण यांच्या ह्या चुकीच्या माहितीमुळे रसिकांमध्ये संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. ही चुकीची माहिती दुरुस्त व्हावी एवढी एक अपेक्षा…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *