मराठी कलाकारांचे लहानपणीचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

मराठी कलाकार आणि त्याच्या शालेय जीवनापासूनचे सर्व फोटो रसिकांना पाहायला नेहमीच आवडतात. ते कोणत्या शाळेत शिकले? त्याचं वय काय? त्याचे आई – वडील कोण? त्यांचं गाव कोणतं? ते कोठे जन्मले? त्यांचं कॉलेज कोणतं ? ते सध्या कोठे राहतात? असे अनेक प्रश्न नेहमीच पडतात. चला तर मग आपण कलाकाराची अशीच माहिती घेऊयात.. (हा भाग १ आहे.. दुसऱ्या भागात आपण अश्याच आणखीन काही कलाकारांबद्दल जाणून घेऊयात)


गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजीत खांडकेकर बद्दल जाणून घेऊयात – ७ जुलै १९८६ रोजी पुण्यात जन्म झाला. अभिजितच शालेय आणि कॉलेज शिक्षण पुण्यातच झालं. झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात त्याने एन्ट्री केली आणि फायनलही गाठले. त्यानंतर त्याने झी मराठीवर अनेक अवॉर्ड शो साठी अँकरिंग केले, त्यानंतर झी मराठीनेच त्याला “माझिये प्रियेला प्रीत कळेना” ह्या मालिकेसाठी लीड रोल ची भूमिका दिली. अवधूत गुप्तेनी त्याला जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या फिल्म मधेही काम करण्याची संधी दिली. सध्या तो “माझ्या नवऱ्याची बायको” हि मालिका आणि “पती गेले ग कोठेवाडी” हे नाटकही करतोय.


गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. १५ वर्षाची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे. ‘लज्जा’ या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहिलि मालिका होती.


मुक्ता बर्वे हीच जन्म १७ मे १९८१ झाला. मुक्ता बर्वे या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. इ.स. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने पुणे विद्यापीठातून (ललित कला केंद्र) नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.


शशांक केतकर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1985 साली झाला. हे सध्या पुण्यात राहतात, त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण सिडनी ऑस्ट्रेलिया येथे झाले आहे. त्यांनी मास्टर ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट सिडनी ऑस्ट्रेलिया मधून पदवी घेतलीय. होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री ची भूमिका साकारली. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचेही मालिकेदरम्यान प्रेम जुळले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले, पण मालिका संपता संपता दोघांचे नातेही संपुष्टात आले. त्यानंतर त्याने “आईच्या गावात” नावाचं आलिशान हॉटेल काढलं. नोव्हेंबर २०१७ साली शशांक केतकर यांनी प्रियांका ढवळे हिच्याशी लग्न केलं.


सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर, इ.स. १९८१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एका मराठी बौद्ध कुटूंबात झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून प्रकाशझोतात आला.


केतकी पराग माटेगावकर हिचा जन्म २२ फेब्रुवारी, इ.स. १९९४ साली पुण्यात झाला. केतकी माटेगावकर आईबरोबर अनेक कार्यक्रमातून गाणे सादर करत असे, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी केतकीला जगभर प्रसिद्धी मिळाली. आजारपणामुळे तिला स्पर्धेतुन बाहेर पडावे लागले, दरम्यान केतकीने २०१२ मध्ये मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित शाळा या मराठी चित्रपटामार्फत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.


सखी गोखले हिचा जन्म 27 जुलै 1993 पुण्यात झाला. प्रसिद्ध कलाकार मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची हि मुलगी पुण्याच्या सह्याद्री स्कूल मधून शालेय शिक्षण घेतले. यानंतर रुपारेल कॉलेज आणि विठाबाई कॉलेज मधून पदवी घेतली. तिने दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या झी वरील मालिकाही केल्यात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *