मराठी कलाकारांची “रंगकर्मी धुळवड”…अशी झाली साजरी

सालाबादप्रमाणे मराठी कलाकार एकत्र जमून धुळवड साजरी करताना दिसले. यंदा ह्या मराठी कलाकारांचे “रंगकर्मी धुळवड” साजरी करण्याचे १४ वे वर्ष आहे. अवधूत गुप्ते, श्रीरंग गोडबोले, अमेय खोपकर, पुष्कर क्षोत्री, अभिजित पानसे , अवधूत- मंदार वाडकर ह्या मराठी कलाकारांनी एकत्र येऊन “रंगकर्मी ” ची स्थापना केली. सुरुवातीला ही धुळवड कोरडी साजरी केली पण हळूहळू ह्यात अनेक बदल होत गेले. शिवजीपार्क, गोरेगाव सारख्या ठिकाणी एकत्र जमून हे सर्व कलाकार धुळवड साजरी करतात.

२०१५ साली मराठी चित्रपटाने साता समुद्रापार बाजी मारली होती त्यामुळे त्या वर्षी ही धुळवड अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरी करण्यात आली होती. एवढेच नाही तर सोडून गेलेल्या कलाकारांची आठवण काढून यावेळी त्या सर्व कलाकारांना आठवणीने श्रद्धांजली वाहिली जाते. हिंदी कालाकारांप्रमाणेच मराठी कलाकार देखील मोठ्या जोशात ही धुळवड साजरी करतात. मराठी सिने सृष्टी आणि मालिका कलाकार एकत्र येऊन रंगांची उधळण करतात. तुला पाहते रे, लागींर झालं जी ह्या मालिकेतील कलाकारांनी देखील आपापल्या मालिकेच्या सेटवर होळी साजरी केली आहे.
सुरुवातीला मराठी कलाकारांची दोन गटात साजरी होणारी धुळवड “रंगकर्मी धुळवडीच्या” निमित्ताने आता एकत्रित साजरी करण्यात येत आहे. ह्यातून कलाकरांमधील दुरावा कमी होत चालल्याची आठवणही हे कलाकार करून देतात. एकमेकातील गैरसमज दूर करून ही मंडळी एकत्र जमून ह्या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *