मराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

पूर्वा गोखलेचा जन्म २० जानेवारी १९७८ साली ठाण्यात झाला. शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल, ठाणे येथे केले. पूर्वा क्लासिकल नृत्यातही निपुण आहे. मुलुंडमध्ये व्ही. जी. वझे कॉलेज मधून शिक्षण घेतले. पूर्वाची आई कांचन गुप्ते ह्या देखील अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील टेलिफिल्म ‘ मना सज्जना’ यात पूर्वाने आणि तिच्या आईने प्रथमच एकत्र काम केले होते. हि फिल्म पूर्वाच्या वडिलानेच निर्मित केली होती.

यानंतर पूर्वाने हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले. ‘कोई दिल में हैं’ ,कहाणी घर घर कि या हिंदी मालिकांमध्ये तिने काम केले. तिने ‘ बुंदे ‘ हा हिंदी गाण्याचा अल्बम देखील केला. ‘कुलवधू ‘ ह्या मालिकेमुळे पूर्वाला भरभरून यश आणि प्रसिद्धीदेखील मिळाली. तिने मराठी रंगभूमीवरही आपली कामगिरी बजावली.

‘स्माईल प्लिज ‘ आणि ‘सेल्फी’ या नाटकात तिने काम केले. थरार, क्या बात है ,भाग्यविधाता, रिमझिम या एकामागून एक मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नुकतेच तिने झी मराठीवरील ‘ स्वराज्यरक्षक संभाजी ‘ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाईंची भूमिका साकारली.

पूर्वा गोखले यांनी केदार गोखले या व्यवसायिकासोबत लग्नगाठ बांधली. पूर्वा गोखले आणि केदार गोखले त्यांना दोन मुलीही आहेत. पूर्वा गोखले सध्या करत असलेलं असीम एनटरटेन्मेन्टच ‘सेल्फी’ हे नाटकही जोरात सुरु आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *