“पवित्र रिश्ता ” मालिकेतून प्रसिद्धीस आलेली मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हिने चक्क मुंबईत आपले स्वतःचे कॅफे सुरू करून एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. या कामात तिला तिचा नवरा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे साथ देताना दिसत आहे. दोघांनी मिळून मुंबई येथे ” द बॉम्बे फ्राईज ” नावाने कॅफे सुरू केले आहे. इरायसा बिल्डिंग, वेव्हरली पार्क, मीरा रोड पूर्व, मुंबई या ठिकाणी सुरू केलेले हे कॅफे अनेकांचे आवडते ठिकाण बनू लागले आहे. ५ मे रोजी या कॅफेचे ग्रॅड ओपनिंग करून तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यावेळी अभिनेता गौरव घाटणेकर हा देखील उपस्थित होता.

काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने त्यांनी हे कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. या आधीही प्रियाच्या वडिलांनी ठाणे येथे रेस्टॉरंट उभारले होते.या अनुभवला स्वीकारत त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तिने हे क्षेत्र निवडण्याचे धाडस केले. यात तिच्या नावऱ्याचीही तितकीच साथ तिला मिळत आहे. शंतनू सध्या झी मराठीवरील “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेची धुरा सांभाळत आहे.

प्रियाचे हे कॅफे दिसायलाही अगदी सुरेख दिसत आहे, त्यामुळे येथे भेट देणाऱ्याच्या प्रत्येक मनालादेखील भुरळ पडते. या कॅफेमध्ये येणारे ग्राहकही वेगवेगळ्या टॉपिंगसने सजवलेल्या फ़्रेंचफ्राय चा आस्वाद घेताना दिसतात.
प्रियाच्या या नवीन वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा!!!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *