मतदान केल्यावर शाई का लावतात?…इतर देशात पहा या पद्धतीने लावली जाते शाई

मतदान केल्यावर तुमच्या बोटाला शाई लावली जाते. ही शाई कुठून येते आणि त्यासंबंधीची माहिती या लेखातून जाणून घेऊयात…भारतात १९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर करण्यात आला होता. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त “सुकुमार सेन” यांनी ही बाब प्रथम अमलात आणली होती. बोटाला शाई लावण्यामागे खूप महत्वाचे कारण आहे. मुळात मतदान प्रक्रियेत कोणताही घोळ होऊ नये किंवा दुबार मतदान होऊ नये हाच या मागचा खरा उद्देश आहे. यासाठी वापरण्यात येणारी शाई देखील तितकीच खास असते. कारण एकदा लावलेली शाई सहजासहजी निघणे अगदी अशक्य जवळपास ७२ तासांपर्यंतदेखील ती पुसली जात नाही.

दक्षिण भारतातील” म्हैसूर पेंट अँड वार्णीश लिमिटेड (MVPL)” कंपनीत ही शाई बनवली जाते. साधारण १० ml शाई १८३ रुपये एवढ्या किमतीला मिळते. ही शाई सरकार शिवाय इतर कोणालाही विकत घेता येत नाही. अशी शाई तयार करण्यासाठी सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण वापरले जाते. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्क आल्यास शाईचा रंग काळा होतो परंतु तो पुसला जात नाही. इथे तयार केलेली शाई मालदीव, इजिप्त, द. आफ्रिका, कंबोडिया या आणि अन्य देशात निर्यात केली जाते.
आपल्याकडे बोटाच्या नखाच्या खालच्या बाजूस शाई लावली जाते मात्र इतर देशाची पद्धत काहीशी वेगळी असते. कंबोडिया आणि मालदीव मध्ये शाईतच बोट बुडवण्याची पद्धत आहे. तर इजिप्त मध्ये ती पेनाने लावली जाते. बुर्किनो फासो, बुरंडी येथे ब्रशच्या सहाय्याने ही शाई लावण्यात येते.
या शाईच्या वापराबाबत तितकीच दक्षता देखील घेतली जाते. साधारण एका बाटलीमध्ये ८०० मतदारांना शाई लावण्यात येते. मात्र उरलेली शाई ही निवडणूक कार्यालयात जमा करावी लागते तिथे ति नष्ट करण्यात येते. त्यामुळे खरेदीपासून ती नष्ट करण्यापर्यतची ही सर्व जोखमीची जबादारीवर तितकीच कटाक्षाने पार पाडली जाते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *