भूमि पेडनेकरचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो पाहून थक्क व्हाल

एकदा वजन वाढलं कि ते कमी करणं फारच अवघड जातं. पण भूमि पेडनेकर याला अपवाद आहे. भूमीने २०१५ साली प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटात हि एखाद्या सामान्य गृहुणीप्रमाणे दिसते. दम लगा के हैशा ह्या चित्रपटाच्यावेळी भूमिच वजन चक्क ८९ किलो होत. त्यामुळे ती तेंव्हा फारच जाड दिसत होती.

दम लगा के हैशा ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तसेच तिला झी सिने पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार, आय.आय.एफ.ए. पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले.


तिची हि प्रसिद्धी पाहून तिला अक्षय कुमारच्या टॉयलेट: एक प्रेम कथा या चित्रपटासाठी निवड करण्यात आली पण ह्या चित्रपटासाठी तिला खूप स्लीम व्हायला सांगण्यात आलेलं. इतक्या कमी काळात (नुकत्याच पदार्पणात) तिला अक्षय कुमार सोबत काम करायला मिळणार यामुळे तिने तिच्या दिसण्यावर खूप मेहनत घेतली आणि ३ महिन्यातच तिने तीच वजन कमी करत ५७ किलो पर्यंत आणलं. त्यामुळे ती फार ग्लैमरस दिसू लागली.

भूमिच्या स्लिम होणंच गुपित विचारलं असता ती म्हणते ‘मला काही साध्य करायचं असते तेंव्हा मी त्यासाठी खूप मेहनत घेते मी कोणतेही डाईट प्लॅन केला नव्हता पण नियमित व्यायाम आणि कमी आहार ह्यामुळे मला हे करणे शक्य झाले. जेंव्हा तुम्ही मनात ठाम निर्णय घेता तेव्हा असं काही करण काहीच कठीण नसतं.


भूमि पेडणेकर हीच जन्म १८ जुलै १९८९ साली मुंबई येथे झाला. तिनं तूच शालेय शिक्षण जुहूच्या आर्य विद्या मंदिर येथून घेतलं. तिचे वडील महाराष्ट्रीयन तर आई पंजाबी आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *