भारताचा क्रिकेटमधील सलामीवीर लवकरच करणार ह्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत लग्न

भारताचा क्रिकेटपटू मनीष पांडे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त व्हायरल झाले आहे. मनीष पांडे पहिल्यांदा २००९ सालच्या आयपीएल सामन्यात चर्चेत आला होता जेव्हा त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू साठी डेक्कन चार्जर्स विरोधी शतक झळकवले होते. २०१५ साली टीम इंडिया कडून त्याने पहिल्यांदा झिम्बाबे विरोधी वन डे मॅच खेळली होती. आपल्या वाडीलांप्रमाणे लहानपणी त्याने आर्मीत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. वडील कृष्णानंद पांडे यांच्याप्रमाणेच त्यालाही देशाची सेवा करायची होती मात्र ओघानेच तो पुढे क्रिकेट या क्षेत्रात उतरला आणि चांगली कामगिरी करून चर्चेत आला.

येत्या २ डिसेंबर रोजी दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्यासोबत तो लग्नाची गाठ बांधणार आहे. ही तारीख जाहीर झाल्यावर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लग्नात मोजक्याच आणि महत्वाच्या मंडळींना आमंत्रित केले असल्याचे एक वृत्तात म्हटले आहे. २६ वर्षाची अश्रित शेट्टी हिने २०१२ साली दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. ओरू कन्नयंम मुनू कालावणीकलम, इंद्रजित, उदयम एनएच४ यासारख्या तेलु आणि तमिळ चित्रपटात काम केले आहे. क्रिकेटर मनीष पांडे आणि अभिनेत्री अश्रिता शेट्टी ह्यांना खूप खूप शुभेच्छा …

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *