“भागो मोहन प्यारे” मधील ह्या अभिनेत्रीबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

झी मराठीवरील जागो मोहन प्यारे मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाल्या नंतर “भागो मोहन प्यारे” ही मालिका नव्याने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेत अतुल परचुरे पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याने साकारलेला हा मोहनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. भोळाभाबडा मोहन आणि त्याच्या प्रेमात अडकलेली मधूवंती हिची ही कहाणी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मधूवंती ची भूमिका साकारली आहे ” सरिता मेहंदळे जोशी” या अभिनेत्रीने.

सरिता ही मूळची सांगलीची आपले शिक्षण झाल्यावर तिने मुंबईत येऊन टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर पदार्पण केले. कलर्स मराठीवरील सरस्वती, तर झी मराठीवरील असे हे कन्यादान मालिकेत तिने काम केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सर्वोत्तम अभिनयासाठी तिला ‘रंगप्रतिभा पुरस्कार’ देखील मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिला कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत झलकण्याची नामी संधी मिळाली. “अर्धसत्य ” या गाजलेल्या नाटकात तिने अमोल कोल्हे सोबत मुख्य भूमिका बजावली होती. इतकेच नव्हे तर ” ए चल असं नसतं रे ” हे प्रसिद्ध नाटक हि तिने साकारले आहे. परंतु पहील्यांदाच तिला “भागो मोहन प्यारे” मालिकेमुळे प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. मालिकेतील रूपवान मधूवंतीच्या जाळ्यात मोहनच काय पण प्रेक्षक देखील अडकताना दिसत आहे. सरिता मेहंदळे जोशी हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *