pushkar jog actor

असे बरेच मराठी कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका बजावली आहे. अगदी महेश कोठारे, सचिन पिळगावकर, पल्लवी जोशी ही प्रसिद्ध नावे देखील हिंदी चित्रपट सृष्टीला एक बालकलाकार म्हणून परिचित. फोटोतील हा बालकलाकार देखील आपल्या वयाच्या ४ थ्या वर्षापासूनच एक कलाकार म्हणून नावारूपास आलेला पाहायला मिळतो आणि आजच्या घडीला तो मराठी सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणूनही ओळखला जातो आज त्याच्याबद्दल जाणून घेऊयात..

marathi actors teenage
marathi actors teenage

या बालकलाकाराचे नाव आहे “पुष्कर जोग”. ‘जबरदस्त’ या महेश कोठारे यांच्या चित्रपटातून त्याने प्रमुख अभिनेता म्हणून काम केले होते. ९० च्या दशकात साखरपुडा, हम दोनो, ऐसी भी क्या जल्दी है, वाजवू का यासारख्या हिंदी – मराठी अशा तब्बल ८ चित्रपटातून पुष्कर जोग याने एक बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. बहुतेक चित्रपटातून त्याच्या नृत्याला विशेष प्राधान्य दिले जात असायचे. त्यानंतर मात्र आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित व्हावे म्हणून अभिनयातून ब्रेक घेण्याचे त्याच्या कुटुंबीयांनी ठरवले. डेंटिस्टची पदवी मिळवल्यानंतर त्याच क्षेत्रात करिअर करायचं अस ठरल्या नंतरही तरुण वयात पुन्हा एकदा अभिनयाची संधी त्याला मिळत गेली. जबरदस्त, डोन्ट वरी बी हॅप्पी, थोडं तुझं थोडं माझं, तुक्या तुकविला नाठ्या नाचविला, सून लाडकी सासरची, जाना पेहचाना, सासूच स्वयंवर अशा चित्रपटातून तसेच मराठी बिग बॉस, हद कर दी आपने, जल्लोष सुवर्ण युगाचा अशा टीव्ही शो च्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर आला. २०१४ साली जॅस्मिन ब्रह्मभट्ट हिच्याशी तो विवाहबद्ध झाला.’ फेलिशा’ हे त्यांच्या मुलीचे नाव. पुण्यातील प्रसिद्ध पी जोग एज्युकेशन ट्रस्टची जबाबदारी जोग कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून सांभाळत आहे. एक बाल्कलकार ते मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अशी ओळख मिळालेल्या पुष्करने नुकत्याच एका गाण्यावर डान्स केला आहे.”तुमच्या गिरणीचा वाजुदे भोंगा..” ह्या गाण्यावर पुष्करने स्त्री वेशात नृत्य सादर केले असल्याचे पाहून कोणालाही त्यावर विश्वास बसत नाहीये . त्याच्या ह्या नृत्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल देखील होत असल्याने पुष्कर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *