बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिची मुलगी आहे खूपच सुंदर…आयपीएल मध्ये खेळाडूंसाठी तिने लावली होती बोली

बोल राधा बोल, डर, ईश्क, फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपटात कधी नटखट तर कधी सोज्वळ भूमिका साकारून जुही चावला ने बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले. अमीर खान सोबत तिने बहुतेक चित्रपटात काम केले त्यामुळे जुही चावला ही अमीर खानची आवडती अभिनेत्री बनली. आता सध्या जुही चावला सिने सृष्टीपासून थोडीशी बाजूला जरी झाली असली तरी वेगवेगळ्या इव्हेंटदरम्यान तिला नेहमी पाहिले जाते.शाहरुख खानच्या आयपीएल टीमची ठी एक सदस्य असल्याने तिला नेहमीच सामने पाहताना पाहायला मिळत.

१९९५ साली जुही चावला हिने बिजनेसमन जय मेहता सोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. २००१ साली मुलगी जान्हवी मेहता हिचा जन्म झाला. जान्हवी आता १८ वर्षाची झाली असून शिक्षण क्षेत्रात तिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शिवाय आयपीएल सिजन ११ साठी खेळाडूंवर बोली लावण्यासाठी तिने आपले वडील जय मेहता सोबत हजेरी लावली होती.
एवढया कमी वयात विचार करून तिने बोली लावल्याने सर्वच स्तरातून तिचे कौतुक झाले होते. जुही चावला आपल्याच प्रोडक्शन हाउस मधून जान्हवीला बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी प्रयत्नात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लवकरच जान्हवी चित्रपटात देखील एक उत्कृष्ट कामगिरी करेल यात शंका नाही. पण अजून ती वेळ येण्यासाठी बराच कालावधी आहे असं जुहीने नुकत्याच झालेल्या एका इंटरव्हिव मधून बोलून दाखवलं होत. जुही चावला हिच्या सुंदर मुलीला जान्हवी मेहताला आमच्याकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *