बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा शाहिद खत्तर या नावानेही ओळखला जातो. सुरुवातीला ‘ताल’, ‘दिल तो पागल है ‘ या चित्रपटात त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. २५ फेब्रुवारी १९८१ साली दिल्ली येथे त्याचा जन्म झाला. अभिनेते पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम यांचा तो मुलगा आहे .शाहिद ३वर्षाचा असताना त्याचे आईवडील विभक्त झाले. शाहिद त्यावेळी त्याच्या आईसोबतच राहिला.

पुढे नीलिमा अझीम यांनी अभिनेता राजेश खत्तर सोबत आपला संसार थाटला.नंतर हे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. शाहीदने ज्ञानभारती स्कुल, दिल्ली आणि राजहंस विद्यालय, मुबई येथून आपले शिक्षणपूर्ण केले. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून त्याने पुढील शिक्षण घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी तो प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्या डान्स ऍकॅडमी मध्ये सहभागी झाला. टीव्हीवरील किट कॅट, पेप्सी, क्लोजअप सारख्या जाहिरातींमध्येही तो झळकला.

‘ईश्क विश्क ‘ हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट चांगलाच हिट ठरला. अमृत राव या चित्रपटात त्याची सहकलाकार बनली. राजश्री प्रोडक्शनचा सुरज बडजात्या दिग्दर्शित ‘ विवाह ‘ चित्रपटात तो पुन्हा अमृत राव सोबत झळकला. हा त्याचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला.

पुढे प्रभू देवाच्या ‘ आर राजकुमार ‘ चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारली. या त्याची सोनाक्षी सिन्हा कोस्टार बनली. ३६ चायना टाऊन, जब वुई मेट, छुप छुप के, दिल बोले हाडीप्पा, ‘तेरी मेरी कहाणी, फिदा, हैदर, उडता पंजाब, पद्मावत यासारख्या दमदार चित्रपटात त्याने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या.

७ जुलै २०१५ साली त्याने मीरा राजपूत हिच्याशी लग्न गाठ बांधली. मीरा ही मूळची दिल्लीतील एक पंजाबी कुटुंबात वाढलेली मुलगी. ७ सप्टेंबर १९९४ साली तिचा जन्म झाला. शाळेत असताना ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नावारूपास आली. तिने युनायटेड नेशन्स मध्ये इंटर्नशीप केली आहे. शाहिद आणि मीराचे कुटुंब एका इव्हेंट दरम्यान भेट घडून आली तेव्हापासून त्याची ओळख असल्याचे सांगितले जाते. त्या दोघांना मिशा नावाची सुंदर मुलगी आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *