बॉलिवूडच्या ह्या 5 अभिनेत्रीचे अंडरवर्ल्ड डॉन सोबत जुळले होते प्रेम…एकीला काम दिले नाही म्हणून निर्मात्याचा केला होता खून

बॉलिवूड हे एक असे क्षेत्र आहे ज्याचे अंडरवर्ल्ड सोबत खूप जुने नाते आहे. अनेकवेळा बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना अंडरवर्ल्ड कडून धमकी दिल्याचे ऐकिवात येत होते. त्याच जोडीला काही प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्ड सोबत नाते जुळवताना देखील दिसल्या. त्यातील एक अभिनेत्री दाऊदसोबत क्रिकेटच्या स्टेडियमध्ये पाहायला मिळाली. एकीला काम दिले नाही म्हणून निर्मात्याचा केला होता खून पाहुयात त्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांचे नाव अंडरवर्ल्ड सोबत जोडले गेले होते…


१. ममता कुलकर्णी आणि विक्रम गोस्वामी- मराठी अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णी हिने बॉलिवूड क्षेत्रात आपले नाव कमावले होते. प्रसिद्धीच्या झोतात असतानाच तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन विक्रम गोस्वामी यांच्यासोबत जोडले गेले. त्यामुळे बॉलिवूडपासून तिला वंचित राहावे लागले. जवळपास १० वर्षे ती त्याच्यासोबत लग्न करून दुबईत स्थिरस्थावर होती. परंतु २०१४ सालच्या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात तिला केन्याच्या पोलिसांनी अटक केली . त्यामुळे बॉलिवूडपासून गायब झालेली ममता पुन्हा चर्चेत आली होती.


२. अभिनेत्री सोना आणि हाजी मस्तान- हाजी मस्तान हे एके काळी महाराष्ट्राच्या दहशतीतील मोठे नाव. दाऊद च्या अगोदर अंडरवर्ल्ड जगतातील हाजी मस्तान हे नाव चर्चेत आले होते. असे सांगितले जाते की हाजी मस्तान हे मधुबालाचे खूप मोठे चाहते होते. मधुबालापर्यत पोहोचण्याआधीच तिचे निधन झाले होते त्यानंतर तिच्याच चेहऱ्याशी मिळती जुळती सोना ही अभिनेत्री त्यांच्या संपर्कात आली आणि दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या.


३. मंदाकिनी आणि दाऊद- राम तेरी गंगा मैली हा चित्रपट साकारून मंदाकिनी प्रकाशझोतात आली. या चित्रपटामुळे मंदाकिणीला अमाप प्रसिद्धी मिळाली. डान्स डान्स, जाल, लोहा , तेजाब यासारख्या अनेक चित्रपटात तिने काम मिळवले. परंतु एका क्रिकेटच्या स्टेडियममध्ये मंदाकिनी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांना एकत्रित पाहिले गेले. दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्या फोटोमुळे समोर येऊ लागल्या होत्या. त्यामुळे साहजिकच तिला बॉलिवूडपासून दूर जावे लागले. असेही सांगण्यात येते की मंदाकिणीच्या बहुतेक चित्रपटासाठी दि कंपनी हातभार लावत होती. त्यानंतर १९९६ मध्ये डॉ कग्यूर ठाकूर सोबत लग्न करून आपल्या संसारात रममाण झाली.


४.अनिता आयुब आणि दाऊद – अभिनेत्री अनिता आयुब हिने बॉलिवूडचे काही निवडक चित्रपट साकारले. यादरम्यान तिचे आणि दाऊद सोबतचे नाते चर्चेला येऊ लागले. १९९५ साली अनिताला चित्रपटात काम दिले नाही म्हणून दाऊदने निर्माता जावेद सिद्दीकीचा खून केला होता. यामुळे अनिता आयुब हि चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती.


५. मोनिका बेदी आणि अबू सालेम- बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री मोनिका बेदी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. चित्रपटात कामे मिळावीत म्हणून दिग्दर्शकाला मोनिका बेदी अबू सालेमच्या नावाने धमक्या देत होती. मोनिका आणि अबू सालेम यांना जेलवरी देखील करण्यात आली होती परंतु काही वर्षाच्या शिक्षेनंतर मोनिकाला सोडून देण्यात आले होते. आजही अबू सालेम जेलमध्ये आपली शिक्षा भोगत आहे. जेलमधून सुटून आल्यानंतर मोनिकाने पुन्हा छोट्या पडद्यावर कामे मिळवण्यास सुरुवात केली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *