बॉलिवूडच्या ह्या ५ अभिनेत्रींनी केवळ पैशासाठी केले लग्न…४ थी आणि ५ वी अभिनेत्री पाहून शॉक व्हाल

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी केवळ पैशासाठी लग्न केली असल्याचे लक्षात येईल. त्यातील काही निवडक अभिनेत्रींनी तर होणाऱ्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्यास भाग पाडले आहे. असे करून त्यांनी त्यांच्यासोबत हा संसार थाटला आहे. अशाकाही अभिनेत्री बाबत आम्ही काही खास गोष्ठी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांची कहाणी थोडी अजब आहे …


१. किम शर्मा आणि अली पुंजनी- मोहोब्बते, केहता है दिल बार बार, फिदा,तुमसे अच्छा कौन है सारख्या निवडक हिंदी चित्रपटात अभिनेत्री किम शर्मा हिने काम केले आहे. एक मॉडेल म्हणुनही ती या क्षेत्रात आजही पाहायला मिळते. २०१० साली किमने अली पुंजनी यांच्यासोबत लग्न केले. अली पुंजनी हे केनिया स्थित प्रसिद्ध बिजनेसमन म्हणून ओळखले जातात. परंतु ६ वर्षाच्या संसरानंतर किमने अली पुंजनी पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच दिवसांपासून किम मॉडेल आणि अभिनेता हर्षवर्धन राणे ह्याला डेट करत आहे.


२.जुही चावला आणि जय मेहता- ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने बॉलिवूडचे अनेक हिट चित्रपट साकारले. ईश्क, हम है राही प्यार के, डर, आईना चित्रपटात तिने अमीर खान, शाहरुख खान, सनी देओल सोबत काम केले. प्रकाशझोतात असताना जुही चावला हिने जय मेहता सोबत संसार थाटला. राकेश रोशनच्या चित्रपटदरम्यान दक्षिण आफ्रिकेत असताना जुहीची जय मेहता सोबत ओळख झाली. जय मेहता हे एक मोठे बिजनेसमन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पहिल्या पत्नीचे खूप आधी निधन झाले होते.त्यानंतर त्यांनी जुही सोबत लग्न केले.


३. ट्युलिप जोशी आणि विनोद नायर- बऱ्याच वेळा ट्युलिप जोशी आणि विनोद नायर यांच्या जोडीला सोशल मीडियावर ट्रोल केलेले पाहायला मिळते. एक मिसमॅच जोडी म्हणून ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. ट्युलिप जोशीने बॉलिवूड, मल्याळम, कन्नड चित्रपटात काम केले परंतु या क्षेत्रात म्हणावा तसा जम न बसल्याने मॉडेल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. इथे तिला अनेक जाहिरातींमध्ये झलकण्याची संधी मिळाली. विनोद नायर यांच्यासोबत ती लीव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. साधारण वर्षभरानंतर तिने विनोद नायर सोबत लग्न केले. विनोद नायर इंडियन आर्मीत महत्वाची भूमिका बजावत. बॉर्डर विंग होम गार्ड साठी ट्रेनर आणि इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.


४. आयेशा टाकिया आणि फरहान आझमी- आयेशा टाकिया हिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात भूमिका निभावल्या आहेत. परंतु फरहान आझमी सोबत लग्न झाल्यानंतर तिने या क्षेत्रापासून दूर राहणे पसंत केले. फरहान आझमी हे अबू आझमी ह्याचे चिरंजीव आहेत. लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात प्रवेश केला. मुंबईत बिजनेसमन आणि रेस्टॉरंट चे मालक म्हणून फरहान आझमी परिचित आहेत.


५. अमृता अरोरा आणि शकील लदाक- मलाईका अरोरा हिची धाकटी बहीण आहे अमृता अरोरा. अमृताने अनेक हिट चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. गोलमाल रिटर्न्स, फाईट क्लब, कितने दूर कितने पास सारख्या चित्रपटात तिने अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. अमृताने २००९ साली आपलीच जवळची मैत्रीण निशा राणा हिच्याच नावऱ्यासोबत म्हणजेच बिजनेसमन शकील लदाकसोबत लग्न केल्याने एक खळबळ माजवली होती.परंतु आम्ही लग्न करण्याआधीच निशा आणि शकील दोघे विभक्त झाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *