बॉलिवूडच्या ह्या अभिनेत्यांनी आपल्याच प्रेयसीच्या लग्नात लावली हजेरी…३ नंबरचा फोटो पाहून वाटेल आश्चर्य

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे लग्न होऊनही आपल्या मैत्रीच्या नात्याला घट्ट सांभाळताना दिसतात. भलेही आपल्या प्रेयसीची लग्न झाली असली तरी कुठलाही आडपडदा न ठेवता हे कलाकार तिच्या लग्नात हजेरी लावताना दिसतात . मागच्या सर्व गोष्टी विसरून पुन्हा नव्याने हे सेलेब्रिटी मैत्रीचे नाते टिकवतात. ह्याला काही सेलिब्रिटी म्हणजेच सलमान खान आणि ऐश्वर्या राय अपवाद म्हणावे लागतील कारण त्यांच्या नात्यातील दुरावा कशामुळे निर्माण झाला हे आपण सर्वच जण जाणतो. असो, पाहूयात अशे कोणकोणते अभिनेते आहेत ज्यांनी स्वतःच्याच प्रेयसीच्या लग्नात हजेरी लावली होती…
१. बिपाशा बसू- बिपाशा बसू हिने बॉलिवूडची अनेक हिट चित्रपट साकारले आहेत. बिपाशा जेव्हा पहिल्यांदा मुंबईत दाखल झाली त्यावेळी तिने अभिनेता डीनो मोरियो ह्याला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. दोघांनी एकत्रित “राज” ह्या चित्रपटात काम केले. अनेकवेळा हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले त्यामुळे मीडियावर देखील ह्या दोघांनी आपल्या प्रेमाबाबत खुलासा केला होता. परंतु बऱ्याच दिवसांच्या प्रेम प्रकरणानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. असे असले तरी बिपाशा आणि करणसिंह ग्रोव्हर ह्यांच्या लग्नात डिनो मोरियो ह्याने हजेरी लावली होती. त्यांनी एकत्रित काढलेले फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. २. सोनम कपूर- अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने “सावरीया” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रणबीर कपूर आणि सोनम कपूर ह्यांचा हा सिनेमा दोघांच्याही प्रेमप्रकणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. अनेक वेळा हे दोघेही एकमेकांना डेट करताना दिसले. परंतु काही कालावधीनंतर ह्या दोघांचे ब्रेकअप झाले. सोनम कपूरच्या लग्नात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ह्यांनी एकत्रित हजेरी लावली होती.

३. अहना देओल- धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ह्यांची मुलगी आहे अहना देओल. खूप कमी लोकांना हे माहीत आहे की रणवीर सिंग आणि अहना देओल एकमेकांना डेट करत होते. रणवीर सिंग आणि अहना दोघेही एकत्रित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेम जुळून आले. बरेच दिवस दोघेही एकमेकांना डेट करत होते. परंतु कॉलेज संपले तसे दोघांचे ब्रेकअप झाले. परंतु अहना जेव्हा लग्नाच्या बेडीत अडकली त्यावेळी रणवीर सिंगला तिने आमंत्रित केले होते. ४. अनुष्का शर्मा- अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांनी दोघांनी एकत्रित “बँड बाजा बारात” चित्रपटात काम केले तेव्हापासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. परंतु काही दिवसातच त्यांच्या ब्रेकपच्या चर्चा रंगू लागल्या. यानंतर अनुष्का ने बॉलिवूडचे अनेक हिट चित्रपट साकारले. अनुष्का आणि विराट कोहली ह्यांच्या लग्नात रणवीर सिंगला आमंत्रित केले होते. रणवीर देखील ह्या लग्नात उत्स्फूर्त पणे सहभागी झालेले पाहायला मिळाला.

५. प्रियांका चोप्रा- प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर ह्यांनी एकत्रित “कमीने” हा चित्रपट साकारला. दोघांनी उघडपणे सांगितले नसले तरी ह्या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. निक आणि प्रियांका ह्यांच्या लग्नात शाहिदला आमंत्रित करण्यात आले होते. शाहिद देखील पत्नी मीरा सोबत ह्या लग्नात आलेला पाहायला मिळाला होता. ह्या सर्वच कलाकारांनी आपल्या प्रेयसीच्या लग्नात हजेरी लावून चर्चेचा विषय ठरले होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *