बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मीडियाच्या वृत्तानुसार आमिषाला यासंदर्भात कधीही अटक होऊ शकते असे बोलले जात आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात… अमिषा पटेलने निर्माता अजय कुमार यांच्याकडून चित्रपट देसी मॅजिक साठी ३ करोड उधार घेतले होते. परंतु चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नसल्याने तिने ते पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. ज्यावेळी अजय कुमार पैशांची विचारणा करत त्यावेळी अमिषाने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली दर वेळी कुठलेही कारण सांगून ती त्याला टाळू लागली.

परंतु शेवटी तिने अडीच कोटींचा चेक देऊन अजयला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने दिलेला तो चेक बाऊन्स झाल्याने हे प्रकरण आणखीनच वाढत गेले. अमिषाने आपली फसवणूक केली म्हणून अजयने तिच्याविरोधात रांची येथे तक्रार दाखल केली. मात्र कोर्टाने आदेश देऊनही अमिषा हजर होत नसल्याने आता तिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिच्याविरुद्ध ही एकच केस नाही तर याआधीही तिने एका इव्हेंटमध्ये जाण्यासाठी पैसे घेतले होते परंतु त्या इव्हेंटला ती हजर राहू शकली नाही उलट त्याच इव्हेंट मॅनेजमेंटला आणखी दोन लाखांची मागणी करून त्यांची फसवणूक केली होती. रांची कोर्टात तिच्याविरोधात खटला चालू असताना तिने तिथे आजपर्यंत हजेरी लावली नाही याच कारणास्तव तिला आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *