बॉलिवूडची ही अभिनेत्री सलमान खान साठी आली होती भारतात…आजही आहे सलमानवर प्रेम म्हणून आहे अजूनही अविवाहित

बॉलिवूड अभिनेता सलमान खान चे नाव तसे अनेक अभीनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. मैने प्यार किया हा सलमानचा पहिलावहिला चित्रपट. या चित्रपटात सलमान खानला पाहिले आणि एक अभिनेत्री चक्क आपला देश सोडून भारतात दाखल झालेल्या चर्चा ९० च्या दशकात रंगलेल्या पाहायला मिळाल्या ही अभिनेत्री आहे सोमी अली. सोमी त्यावेळी अवघी १६ वर्षाची होती जेव्हा ती सलमान खानवरील प्रेमाखातर आपला देश सोडून भारतात आली होती. असेही सांगण्यात येते की सलमान खान आणि सोमी अली जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट करत होते. एवढेच नाही तर ते दोघे लग्न देखील करणार असल्याचे बोलले जात होते.

सोमी भारतात आली आणि बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपटात काम केले. सलमान सोबत तिने एक चित्रपट साकारला पण तो चित्रपट काही कारणास्तव प्रदर्शित झाला नाही. मध्यंतरी दोघांमध्ये जोरदार भांडण देखील झाल्याच्या चर्चा होत्या ज्यात सलमानने एका कोल्ड्रिंक च्या बाटलीने तिचे डोके फोडले होते. परंतु या सर्व अफवा असल्याचे तिने एका इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट केले होते.’ माझ्या डोक्यावर जर सलमानने कोल्ड्रिंकची बाटली फोडली असती तर मी त्यावेळी दवाखान्यात दाखल झाली असते’ . त्यामुळे या बातमीत कुठलेच तथ्य नसल्याचे तिने सांगितले.
खरं तर सोमी अली ५ वर्षाची असताना तिच्या घरातील नोकराने तिच्यावर बलात्कार केला होता. यूएसला शिक्षणासाठी गेल्यावर तिथेदेखील तिला याच परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे सोमी आजही अविवाहित असून लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी ती मदतीचे कार्य करताना दिसत आहे. याच कार्यात सक्रिय राहून अशा पीडित महिलांसाठी ती कार्य बजावत आहे. सोशल मीडियावर देखील अनेकदा अशा घटनांची वाच्यता फोडताना ती दिसते. सलमानची पहिली गर्लफ्रेंड असल्याचा शिक्का मिळवलेली ही अभिनेत्री आजही अविवाहितच आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *