बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर संजय दत्तच्या मुलीला बसला धक्का लिहिली भावनिक पोस्ट…वाचणाऱ्याच्याही डोळ्यात आले पाणी

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या मुलीने “त्रिशाला दत्त” हिने आपल्या इन्स्टाग्राम वरून एक भावनीक पोस्ट शेअर केली आहे. त्रिशाला दत्त ही संजय दत्तची पहिली पत्नी रीचा शर्मा हिची मुलगी आहे. तिने न्यूयॉर्क मधून आपले पदवीचे शिक्षण घेतले परंतु मॉडेलिंग आणि फॅशन मध्ये तिला जास्त रुची आहे. त्रिशाला आपल्या इन्स्टाग्राम वरून नेहमी आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते . तिचा फॅन फॉलोअर्स देखील चांगला असल्याने ती नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे.

परंतु नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम वरून बॉयफ्रेडचे निधन झाले असल्याचा धक्कादायक खुलासा केला ज्यात ती स्वतः खूप दुःखी असल्याचे तिने नमूद केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम वर तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली . २ जुलै २०१९ रोजी तिच्या इटालियन बॉयफ्रेंडचे निधन झाल्याचे यात तिने सांगितले आहे. ज्याच्यावर तिचे जीवापाड प्रेम होते तीच व्यक्ती आज या जगात नाहीये अशा शब्दात तिने आपली भावना व्यक्त केली आहे. तिने लिहिलेली ही पोस्ट अल्पावधीतच तुफान व्हायरल झाली. एवढेच नाही तर अनेकांनी तिच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. तिचे लिहिलेले शब्द वाचून वाचणाऱ्याच्याही डोळ्यात आपसूक पाणी येईल. त्याने माझ्यावर केलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. माझी घेतलेली काळजी आणि रक्षण याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. मी जगातली सर्वात भाग्यवान मुलगी आहे जिला तुझे प्रेम मिळाले. कालच्या पेक्षाही आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करते. तिच्या या शब्दातूनच ती किती दुःखी आहे याची जाणीव वाचणाऱ्यालाही झाली असेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *