“बॉईज २” चित्रपटातील ह्या सुंदर अभिनेत्रीची सगळीकडे होतीये चर्चा..तिचे एकापाठोपाठ एक असे तब्बल ५ चित्रपट होतायेत रिलीज

बॉईज चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता “बॉईज २” बॉक्स ऑफिसवर लवकरच येतोय. येत्या ५ आक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपट मुलांच्या कॉलेज जीवनावर आधारित असून त्यात यंग जनरेशन कश्याप्रकारे आपला वेळ वास्तवात घालवतात आणि त्यामुळे कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावेलागते हे दाखवण्यात आलय. सुमित शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांसोबत दिग्गज कलाकार यतीन केळकर, गिरीश कुलकर्णी, शर्वरी जेमनीस हेही ह्या चित्रपटात आहेत. नुकताच बॉईज २ चा ट्रेलर लाँच झाला आणि एका अभिनेत्रीबद्दल सर्वाना जाणून घावस वाटतंय ती म्हणजे “पल्लवी पाटील”.

पल्लवी पाटील हि बॉईज २ चित्रपटात शिक्षिकेचा रोल निभावतेय. याआधीही ती बऱ्याच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलीय. पल्लवीचा जन्म ४ नोव्हेम्बर रोजी धुळे येथे झाला. पल्लवी पाटील हिने तिचे शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून केले, तर प्रताप कॉलेज मधून पुढील शिक्षण घेतलं .त्यानंतर पुण्याच्या डी वाय पाटील कॉलेजमधून आर्किटेक्टची पदवी मिळवली. पण तिला अभिनयाची आवड असल्याने तिने मॉडेलिंग करायला सुरवात केली. काहीदिवसातच तिला क्लासमेट ह्या चित्रपटाची ऑफर आली आणि मराठी सिनेजगतात तिने पाऊल टाकले.
त्यानंतर ७०२ दीक्षित्स, शेंटिमेंटल, सविता दामोदर परांजपे ह्या चित्रपटांत ती पाहायला मिळाली. तिचा अभिनय आणि हावभाव याला प्रेक्षकांनी चांगलीच प्रसिद्धी दर्शवली. त्यामुळे तिला एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले. ह्याच वर्षी तिचे आणखीन ३ चित्रपटही येतायेत ” तू तिथे असावे”, “चक्रविव्ह” आणि “बस्ता”. एकाच वर्षात तब्बल ५ चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे ती सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. सह्याद्री सिने पुरस्कार २०१५ चा बेस्ट सपोर्टींग एक्टरेस चा किताबही तिला मिळाला. तिला तिच्या चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *