बिग बॉसच्या घरात “शिवानी सुर्वेचीच” चर्चा… शिवानीच्या रागावर बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया

मराठी बिग बॉस २ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. बिचुकले, वीणा, पराग कान्हेरे, किशोरी शहाणे, रुपाली भोसले, शिव या सर्वानीच बिग बॉसच्या घरात चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या वेगवेगळ्या टास्कच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये खटके उडालेले देखील पाहायला मिळत आहेत. ज्यात विशेष करून शिवानी सुर्वे हिचे वागणे प्रेक्षकांना न रुचण्यासारखे आहे. सुरुवातीला, बिचुकले आणि किशोरी शहाणे यांच्यासोबत घातलेला वाद चर्चेत राहिला होता. त्यामुळे शिवाणीने आपल्या रागावर कंट्रोल ठेवावा असे मत सगळ्यांनीच व्यक्त केले.

ह्या आठवड्यात शिवानी सुर्वे बिगबॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे. ती आजारी असल्याचे कारण सांगितल्याने बिग बॉसच्या आदेशानुसार तिची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली ज्यात तिला फिट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिवानी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
यासंदर्भात शिवणीच्या बॉयफ्रेंड ची देखील प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवानी सुर्वे ही अभिनेता “अजिंक्य ननावरे” ह्याला डेट करत आहे. गेल्या ४ वर्षांपासून ते एकमेकांना खूप चांगले ओळखत आहेत. अजिंक्य ननावरे याने हे मृत्युंजय, वाडा चिरेबंदी, अनन्या सारखे नाटक गाजवले आहेत. तर छोट्या पडद्यावरील “सख्या रे” ही मालिका त्याने साकारली आहे. शिवानी आणि अजिंक्य दोघांनी एकत्रित “तू जीवाला गुंतवावे” ही मालिका साकारली आहे. बिग बॉसच्या घरात शिवाणीच्या वागण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला परंतु अजिंक्यने शिवाणीची बाजू सावरत म्हटले की, शिवानी ही अतिशय प्रेमळ मुलगी आहे. आयुष्याच्या कठीण काळात तिने हिमतीने स्वबळावर आपले करिअर घडवले आहे. त्यामुळे ती खूपच हळवी होते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *