बाबा रामदेव यांचं ‘स्वदेशी समृद्धी’ मोबाईल सिम कार्ड लाँच. सर्वात स्वस्त दर आणि भरघोस ऑफर्स

पतंजली प्रोडक्ट्सची सध्या मार्केटमध्ये बूम असताना रामदेवबाबांनी काल आणखीन एक प्रॉडक्ट बाजारात आणलाय ते म्हणजे चक्क मोबाइल सिमकार्ड. नुकतीच बाजारात जिओ मुळे मोबाईल अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा जवळपास सर्वच मोबाईल धारकांना मिळत आहे. आणि त्याच सोबत असणारे दररोजचे नेट यामुळे तुम्हाला वाटेल कि बाबा रामदेव यांचे सिम चालणार नाही.. पण जरा थांबा. तुम्ही त्यांच्या ऑफर्स अजून पहिल्या नाहीत त्या आधी एकदा पहाच

बाबा रामदेव यांनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीसएनएल यांच्या सोबत मिळून “स्वदेशी समृद्धी” सिम कार्ड बनवली आहेत. चक्क १४४ रुपयांत हे कार्ड महिनाभर चालणार असून दररोज २ जीबी पर्यंत डेटा हि पुरवणार आहे. इतकाच नव्हे तर हे कार्ड ज्या मोबाईल धारकांकडे असेल त्यांना चक्क पतंजलीच्या प्रोडक्टसवर १०% इतकी घसघशीत सूट हि मिळणार आहे.

सध्या हे कार्ड प्रायोगिक तत्वावर लाँच केलं असून काही दिवसांनी सर्वाना हे कार्ड मिळेल अशी आशा आहे. तातपुरते हे कार्ड फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याची ऑफिशीअल अनोऊन्समेंट येत्या काही दिवसात होणार असं सांगितलं जातंय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *