बहुगुणी आवळ्याचे हे चमत्कारिक फायदे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

आवळा म्हटले की शाळेत असताना झाडावरील ताजे आवळे पाडून मीठ लावून खाल्याचे तुम्हाला आठवत असेल, किंवा एखादी आवळा सुपारीची चव तुम्ही नक्कीच चाखली असेल ? , पण हे आवळ्याचे फळ किती गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊयात याचे कोणते फायदे आहेत ते…

आवळा हे फळ साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. याची चवदेखील काहीशी तुरट ,आंबट स्वरूपाची तुम्हाला जाणवेल. आवळा कोणत्याही स्वरूपात असला तरी, म्हणजे अगदी सुकवलेली आवळा सुपारी असो, किंवा पाकात मुरवलेला आवळा असो त्याचे गुणधर्म अगदी जसेच्या तसे तुम्हाला मिळतील . म्हणजेच कुठल्याही स्वरूपात याचे सेवन केले तरी आपल्याला त्याचा फायदाच होतो.

आवळ्यापासून च्यवनप्राश, कँडी, आवळा सुपारी, मोरावळा, लोणचे पाणावले जाते. रोजच्या आहारात याचे सेवन केल्यास पचनाच्या बाबतीतील समस्या दूर होण्यास फायदेशीर ठरते. जेवण अगोदर रोज आवळा या फळाचे सेवन करावे त्यामुळे पोटदुखी ,अपचन ,गॅसेस याना त्वरित अराम मिळू शकतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क जीवनसत्त्व’ असल्याने दररोज सकाळी अनशेपोटी आवळ्याचा रस पिल्यास शरीरातील मरगळ ,थकवा किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी हे फायदेशीर ठरते.

उन्हाळ्यात हिट स्ट्रोकमुळे बहुतेकांना नाकाचा घोळणा फुटण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते अशावेळी आवळा खायला दिल्यास शरीराला विशेषतः मेंदूला थंडावा मिळून नाकातून होणार रक्तस्राव थांबवता येतो. कुठल्याही च्यावनप्राशमध्ये आवळा हे महत्वाचा घटक मानला जातो ,म्हणूनच अशक्तपणा आल्यास च्यवनप्राशचे सेवन केले जाते. रक्तातील दोष नाहीसे करण्याचा महत्वाचा गुणधर्म आवळ्यात असल्याने आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो.

केसांच्या समस्येवरील रामबाण इलाज म्हणून याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.त्याच प्रमाणे याचे चूर्ण केसांना लावायच्या मेहेंदीत एकत्रित करून लावल्यास केस गळती थांबून काळेभोर केस तसेच केसांची वाढ होताना दिसते.
परंतु कफ प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी याचे सेवन करणे धोक्याचे असते त्यासाठी वैद्यकिय सल्ल्याने याचे सेवन करणे योग्य ठरेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *