मराठी , दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड सृष्टीत अभिनयाचा ठसा उमठवणारा मराठमोळा कलाकार अतुल कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. अतुलचे २९ डिसेंबर १९९६ रोजी अभिनेत्री गीतांजलीसोबत लग्न झाले परंतु लग्नाला इतकी वर्षे होऊनही त्यांनी मूल होऊ दिले नाही याला कारणही तितकेच खास आहे. एका मुलाखतीत स्वतः अतुल कुलकर्णी याने त्याच्या लव्ह स्टोरीचा किस्सा ऐकवला होता. त्याच्या या गोष्टीवर अगदी घरच्यांनीसुद्धा अवाक होऊन प्रतिक्रिया दिली होती ती अशी…

कॉलेजमध्ये असल्यापासून अतुल आणि गीतांजलीला अभिनयाची आवड त्यामुळे दोघांनीही नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, दिल्ली येथिल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. अतुल दुसऱ्या वर्षाला शिकत होता तेव्हा गीतांजली ही पहिल्या वर्षात शिकत होती. कॉलेजमध्ये त्यांचा मराठी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप होता त्यात गीतांजलीचा देखील प्रवेश झाला. ग्रुपमधून त्यांची दोघांची ओळख झाली. एकदा इंडिया गेटवर फिरायला गेलो असता गीतांजलीने अतुलला प्रपोज केले. परंतु अतुलने तिला आपला होकार लगेचच न देता थोड्या दिवसांनी दिला. मी तिच्या प्रेमात कसा पडलो हे देखील माझ्यासाठी एक कोडेच होते. जेव्हा घरच्यांना आम्ही दोघे लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले तेव्हा त्याचे घरचे देखील त्याच्या या निर्णयावर अवाक झाले होते.
अतुल आणि गीतांजली यांचे लग्न होऊन इतकी वर्षे झाली असली तरी त्यांनी अजूनही मूल होऊ दिले नाही याचे कारण देखील त्याने स्पष्ट केले, आम्ही दोघे अगदी विचारपूर्वक ह्या निर्णयापर्यत पोहोचलो आहोत. आम्हा दोघांनाही संसारात अडकून पडायचे नव्हते आम्हाला आमचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हवे होते. आम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत एकमेकांना खूप चांगले समजून घेऊ शकतो. पारंपरिकता, नवरा बायकोची चौकट हे आम्हा दोघांनाही मान्य नाही त्यामुळे आम्ही अपत्य होऊ दिले नाही हा आमचा दोघांचा निर्णय आम्हाला मान्य आहे, असे त्याने त्यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *