sonalee kulkarni apsara aali wedding

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोनाली कुलकर्णी कधी लग्न करणार याच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत होत्या. त्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सोनाली परदेश दौऱ्यावर गेली असता बॉयफ्रेंडसोबत आपला वेळ घालवत असल्याचे तीने सांगितले होते. त्यापाठोपाठ सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंड बाबत अनेक चर्चा देखील रंगत गेल्या. त्याच दरम्यान सोनालीने एक ज्वेलरीची ऍड देखील साकारली होती या ऍडमध्ये सोनालीने उलटे मंगसूत्र देखील परिधान केलेले दिसून आले त्याबाबत सोनाली खरंच विवाहबंधनात अडकली आहे का? यासंबंधी बातम्या पसरू लागल्या होत्या. या बातम्यांना सोनालीने स्वतः पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे.

sonalee kulkarni wedding
sonalee kulkarni wedding

आज म्हणजेच १८ मे रोजी सोनालीचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिने आपली लग्नाबाबतची एक खाजगी बाबही चाहत्यांसोबत शेअर केली आहे ती म्हणजे , सोनालीने २ फेब्रुवारी २०२० रोजीच आपला बॉयफ्रेंड कुणाल बेनोडेकर सोबत अगदी खाजगीतच साखरपुडा केला आहे. त्याचे फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर देखील केले आहेत. तिच्या या बातमीने चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. कारण या इंडस्ट्रीतील बरेचसे कलाकारही या बातमीने आश्चर्यचकित झालेले पाहायला मिळत आहे. याबाबत सोनालीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. कुणाल आणि त्याचे कुटुंबीय गेल्या कित्येक वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. सोनाली आता कुणालसोबत लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निश्चितच लागून राहिली आहे तूर्तास सोनाली कुलकर्णीला वाढदिवस आणि साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!

sonalee kulkarni wedding pic
sonalee kulkarni wedding pic
sonalee kulkarni sakharpuda
sonalee kulkarni sakharpuda

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *