बद्धकोष्ठता, मुळव्याध, संधिवात यासर्वासाठी फायदेशीर आहे हे फुल .. तर आदिवासी भागात बनवतात याच फुलांची दारू

महाराष्ट्रातील मेळघाट सारख्या ठिकाणी आदिवासी जमाती आढळतात. त्यांच्या आहारात मोहाच्या फुलांचा समावेश असतो. या झाडाला ते देव मानतात. सण साजरे करताना या फुलांपासून बनवलेली दारू ते देवाला वाहतात. साधारण मार्च महिन्यात या फुलांना बहार येतो. ही फुले गोळा करून वाळवून ठेवली जातात. पैशांची अडचण भासल्यास हीच फुले विकून ते आपले गुजरान करतात. या फुलांची फळांची भाजी देखील बनवली जाते. मोहाची फुले नावाप्रमाणेच अतिशय मोहक असतात.

त्याचा सुगंध जितका मधुर तितकीच त्याची चवही मधुर लागते. साधारण सात आठ फुले खाल्ली की लगेचच नशा आल्यासारखे वाटते. या झाडाचेदेखील अनेक फायदे सांगितले जातात. बांधकाम, इंधन म्हणून या लाकडाचा वापर केला जातो. झाडाची फळेदेखील अतिशय उपयुक्त ठरतात. बियांपासून तेल काढले जाते. त्वचाविकार, केसांसाठी, खाद्यतेल म्हणूनही याचा वापर केला जातो. श्वसनाचे विकार, बद्धकोष्ठता, संधिवात, पोटाचे विकार यासर्वासाठी मोहाची फुले खाणे फायदेशीर ठरतात. अनेक औषधी कंपन्याही ह्या फुलांचा वापर औषध बनवण्यासाठी करतात.
पूर्वी ह्या फुलांवर सरकारची कोणतीही बंधने नव्हती पण ह्याचा सदुपयोग होण्याऐवजी गैरवापर व्हायला लागला आणि सरकारला ह्यावर कठोर पाऊले उचलावी लागली. ह्याचा परिणाम म्हणजे ह्याची अवैध प्रकारे विक्री केली जाते. बहुगुणी झाड काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अडचणीत आणलं आणि ह्यापासून होणारे घरगुती उपायांवरही अडचणी निर्माण झाल्या.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *