फॅशन डिझायनरने घालायला सांगितलेले कपडे योग्य नसल्याने ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शिवीगाळ करत केली मारहाण

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधात तिच्याच एका लेडी फॅशन डिझायनने शिवीगाळ आणि मारहाणीचा खळबळजनक आरोप केला आहे. याविरोधात त्या लेडी फॅशन डिझायनने काशिमीरा पोलीस ठाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एका शोदरम्यान अभिनेत्री प्राजक्ताला दिलेले कपडे योग्य नसल्याच्या कारणावरून तिने फॅशन डिझायनरला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने केला आहे.

नक्की काय घडले होते ते प्राजक्ताने स्पष्ट केले असले तरी देखील या दोघींचा म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही व्हायरल होताना दिसत आहे. मात्र या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे. काळ रात्री अनेक सोशिअल माध्यमांनी आणि मीडियाने हि बातमी दिल्यानंतर प्राजक्ता माली हिने आपले मत व्यक्त केले.
प्राजक्ताच्या म्हणण्यानुसार व्हायरल होत असेलेले व्हिडिओ हे खोटे असून काही खोटे फोटो हि व्हायरल होत असल्याचा तिचा दावा आहे. जान्हवी मनचांदा हि माझी फॅशन डिझायनर होती आणि कपड्यांवरून माझं तिच्याशी मतभेद झाले होते. परंतु मी तिला मुळीच मारहाण केली नाही आणि ती हे सगळं तिच्या प्रसिद्धीसाठी करत आहे. हवं तर तुम्ही सेट वर उपस्तित असलेल्या व्यक्तींना विचारू शकता. प्रसिद्धीसाठी आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *