प्रीति जिंटा व पती जीन गुडइनफ यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? प्रीति जिंटा बद्दल बरच काही नक्की वाचा

प्रीती झिंटा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म जानेवारी ३१, १९७५ रोजी शिमला येथे झाला. तिने हिंदी भाषे शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपट सुद्धा अभिनय केला आहे. शिमला मधील कॉन्वेंट ऑफ़ जीज़स एंड मेरी बोर्डिंग विद्यालय येथून शिक्षण घेतले. पुढे सेंट बेडेज़ कॉलेज मधून गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी घेतली.

प्रीति जिंटा यांचे वडील इंडियन आर्मी मध्ये मोठे अधिकारी होते. प्रीती १३ वर्षांची असतानाच एका कार अपघातात गेले. प्रीतीला दीपांकर आणि मनीष असे दोन भाऊ आहेत. दीपांकर इंडियन आर्मी मध्ये तर मनीष कॅलिफोर्नियात सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.


१९ फेब्रुवारी २०१६ रोजी तिने जीन गुडइनफ ह्या आपल्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड सोबत लॉस अँजेलिस येथे लग्न केलं. जीन गुडइनफ हे एन लाईन पॉवर एनर्जी ह्या यू.एस. मधील कंपनीत सिनिअर व्हॉइस प्रेसिडेंट आहेत.


प्रीती जिंटाने १९९८ साली दिल से या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिल से तसेच त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

तिच्या दिल चाहता है, कल हो ना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत.दोन्ही गालां वरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हीची जमेची बाजू मानली जात असे.


(जीन गुडइनफ यांची संपूर्ण फॅमिली जेंव्हा भारतात आली तेंव्हाच हा फोटो २०१७ च्या डिसेंबर महिन्यातील हे फोटो आहेत)
परंतु २००६ पासून प्रितीने सिनेमांत काम करण जवळपास बंद केलं आणि ती इंडियन प्रीमिअर लीग IPL मध्ये पंजाब च्या क्रिकेट टीमची मालक बनली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *