प्रिया अरुण कर्नाटकी ह्या लक्ष्याच्या प्रेमात कश्या पडल्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पहिल्या लग्नातून विभक्त न होताच दुसरं लग्न तातडीनं का केलं?

प्रिया बेर्डे यांचं लग्ना पूर्वीच नाव “प्रिया अरुण कर्नाटकी” असं होत. पण फिल्मी दुनियेत त्यांना प्रिया अरुण ह्या नावानेच ओळखले जाते. प्रिया अरुण ह्यांचे वडील अरुण कर्नाटकी हे त्या वेळचे खूप मोठे निर्माते, त्या काळचे प्रसिद्ध छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांचे ते पुत्र दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. “धोंडी धोंडी पाणी दे, तिखट मिरची घाटावरची, चावट, पाठलाग, लपवाछपवी, बंदिवान मी ह्या संसारी” असे एका पाठोपाठ एका सुपर डुपर हिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

१७ ऑगस्ट १९६७ रोजी कोल्हापूरमध्ये प्रिया अरुण कर्नाटकी यांचा जन्म झाला. त्याकाळी पुण्या-मुंबईपेक्षा लोक कोल्हापूरला मराठी फिल्मसिटी समजायचे, त्यामुळे जवळपास सर्वच निर्माते आणि कलाकार कोल्हापूरला स्थायिक व्हायचे. पण नंतर हे कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. आपले शालेय शिक्षण संपल्यानंतर प्रियाने काही व्यावसायिक नाटके केली. त्याचे हे काम पाहून वडिलांनी तिला चित्रपट मिळवून दिला. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे चांगला नाव लौकिक असलेला चमकता सुपर स्टार होता. रंगत संगत चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना प्रियाला चित्रपटात छोटा रोल करायला मिळाला, तो तिने उत्तम निभावला.
त्याच वर्षी प्रियाला आणखीन एक संधी मिळाली त्या चित्रपटाचं नाव होत ” अशी हि बनवा बनवी “. अशी हि बनवा बनवी ह्या चित्रपटामुळे “प्रिया अरुण” रातोरात सुपरस्टार बनली. ह्या चित्रपटानंतर तिचा त्याच वर्षी आणखीन एक चित्रपट सुपरहिट ठरला तो म्हणजे “एक गाडी बाकी अनाडी”. त्या पाठोपाठ “अफलातून” ह्या चित्रपटात तिला अशोकसराफ, लक्ष्मीकांत आणि वर्षा उसगावकर यांसारख्या दिगज्जांसोबत काम करायला मिळालं. पुढे “घनचक्कर” आणि “थरथरत” चित्रपटही खूप गाजला. तिच्या कारकिर्दीच्या पहिल्या २ वर्षात तिने केलेल्या ५ चित्रपटातच ती मराठी सिनेजगतातील मोठी अभिनेत्री सुपरस्टार म्हणून ओळखू लागली.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचं रुही ह्या चित्रपट अभिनेत्री सोबत त्यांचं लग्न झालं. रुही बेर्डे ह्यांनी ‘मामला पोरीचा’ ‘अराम हराम आहे’ ह्या चित्रपटात भूमिका केली तसेच अनेक मराठी चित्रपट आणि नाटके हि केली. ५ एप्रिल १९९८ साली मुंबईच्या बांद्रा येथे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधना आधीच लक्ष्मीकांत बेर्डें यांनी प्रिया अरुण ह्या दिग्गज मराठी अभिनेत्रींसोबत दुसरा विवाह १९९६ साली केला. ह्या दोघांची केमिस्ट्री खूप वेगळी आहे.

प्रिया बेर्डे यांच्या आई आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एकमेकांना खूप आधीपासून स्टेज शो मुळे ओळखायचे. प्रियाची आई १९९० साली खूप आजारी पडली त्यांना पाहण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं येणंजाणं वाढलं आणि त्यातूनच दोघांच प्रेम जुळून आल. तब्बल आठ – नऊ वर्ष दोघांचं अफेअर सुरु राहील. पण १९९७ साली प्रिया अरुण ह्या प्रेग्नन्ट झाल्या आणि त्यांना लग्न कराव लागल. ह्या कारणामुळे रुही याना डिवोर्स न देताच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया सोबत तातडीनं लग्न केलं. लग्नाच्या 4 महिन्यांनी प्रियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्याचं नाव अभिनय बेर्डे. हा संपूर्ण खुलासा प्रिया बेर्डे यांनी अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथे गुप्ते ह्या कार्यक्रमात केला होता.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *