प्रियांका चोप्राशी तंतोतंत जुळणारी मॉडेल ‘सेम टू सेम अगदी जसेच्या तसे’

जगात कुठेना कुठे तुमच्या चेहऱ्याशी जुळणारी व्यक्ती असते असे बऱ्याचदा बोलले जाते. प्रियांका चोप्राच्या बाबतीतही काहीस असाच घडलाय. इंस्टाग्रामवर तिच्यासारखे अनेक फोटो पाहायला मिळताहेत. फरक फरक एवढा आहे कि तिच्या सारखी दिसणारी मॉडेल हि दिसायला सावळी आहे. पण चेहरा अगदी प्रियांका सारखाच आहे.

मेगन मिलान असं या मॉडेलचं नाव आहे. तिने प्रियांकाच्या लूक सारखे काही फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुक वर नुकतेच शेअर केलेत ह्यात ती अगदी प्रियांकाचा आहे असा भास होतो. पण बाकीचे फोटो त्या दोघीतला फरक स्पष्ट करतात. प्रियांका सध्या हॉलिवूड मध्ये काम करतेय तिचे आणखीन दोन सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. सध्या ती मुंबईत आलीय पण पुढच्याच पाहिल्यात ती पुहा शूटिंगला जाणार असल्याचेही बोलले जातेय.

प्रियांकाने काही मराठी सिनेमाचे प्रोडूकशन हि केले आहे. व्ह्यनटीलेटर आणि काय रे रास्कला हे दोन सिनेमे तिनेच प्रदर्शित केलेत. यापुढेही ती मराठीसाठी सिनेमे बनवणार असून येणाऱ्या चित्रपटात ती स्वतः गेस्ट च्या रूपात मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *