प्रसिद्ध अभिनेते “संजय क्षेमकल्यानी” यांच्या इंजिनिअर पत्नीबद्दल हे पाहून आश्चर्य चकित व्हाल

प्रसिद्ध अभिनेते संजय क्षेमकल्यानी हे मराठी रंगभूमी तसेच मालिका,चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. नुकताच त्यांचे ” तेरा दिवस प्रेमाचे” हे विनोदी नाटक रंगभूमीवर सादर होत आहे. माझे मन तुझे झाले, अस्मिता, प्रीती परी तुजवरी, नकुशी , चंद्र आहे साक्षीला या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. नवसाचं पोर, जेता य चित्रपटासोबत त्यांनी अपराध मीच केला, बायको धमाल मेव्हणी कमाल सारखी नाटके साकारली. सीआयडी सारख्या अनेक हिंदी मालिकांत त्यांनी कामही केले.

याशिवाय संजय क्षेमकल्यानी यांनी लहानग्यांसाठी ” दे धमाल ” द्वारे सुट्टीतील सहलीचे आयोजनाचे काम करत आहेत. नाशिक येथील इगतपुरी या निसर्गरम्य परिसरात एका ब्रिटिशकालीन घरात मुलांच्या “दिवाळी आणि उन्हाळी सहलींचे” आयोजन केले जात आहे. याठिकाणी मुलांना डोंगर चढणे,चित्रे काढणे, मातीची खेळणी बनवणे, संगीत, गप्पा- गोष्टी, मैदानी खेळ यांसोबत दुर्बिणीच्या साहाय्याने तारांगण बघणे, रोबोटिक्स चे ज्ञान अवगत करून दिले जाते.
या कामात त्यांना त्यांची पत्नी अर्चना क्षेमकल्यानी याही मदत करताना दिसतात. अर्चना या इंजिनिअर आहेत. जवळपास वीस वर्षे त्यांनि नोकरी पत्करली होती. इगतपुरी येथील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास १९०० फूट उंचावर स्थित आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या ठिकाणाची पालकही आपल्या लहान मुलांना या सहलीसाठी आवर्जून पाठवतात. इतका मोठा कलाकार आणि त्याला त्यांच्या पत्नीची साथ.. लहानग्यांसाठी हे काम करताना पाहून आजही लोकांना ह्यावर विश्वास बसत नाही. धम्माल किड्स कॅम्प नावाने यांची वेबसाईट हि आहे त्यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *