चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला शिवसेनेच्या मिथुन खोपडे यांनी आमंत्रित केले होते. परंतु तिथे दाखल झाल्यापासूनच भाग्यश्रीला बऱ्याच वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले असल्याचे तिने आपल्या पोस्टद्वारे सांगितले आहे. नागपूरला फ्लाईटने ती सकाळी ८ वाजताच दाखल झाली होती. सकाळचे नऊ वाजून गेले तरीही तिला रिसिव्ह करण्यासाठी व्यवस्थापकापैकी कोणीच तिथे आले नव्हते. त्यानंतर त्यांची लोक तिथे आल्यावर लगेचच पुढील कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून तुम्हाला मेकअप वगैरे करायचं असेल तर करा नाहीतर काहीच हरकत नाही असे म्हणून नागपूरपासून १८० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे ते पोहोचण्यासाठी ते रवाना झाले.

संध्याकाळी साधारण सहा ते साडे आठ वाजेपर्यंत भाग्यश्री मोटे आणि तिच्यासोबत आलेली कलीग या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते त्यानंतर मात्र परतीच्या प्रवासाला खूप उशीर होईल म्हणून या दोघीनी कार्यक्रमातून निरोप घेण्याचे ठरवले. यादरम्यान भाग्यश्रीने आयोजकांना वारंवार फोन लावले परंतु आयोजक समोर बसलेले असूनही ते दुर्लक्ष करत होते. शिवाय कार्यक्रम संपेस्तोवर तिथेच थांबण्याची त्यांना मागणी केली. त्यानंतर भाग्यश्रीने परत जाण्यासाठी फ्लाईटची तिकिटं मागितली तर आयोजकांनी तिकिटच बुक केली नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय रात्री फ्लाईट नसल्याने राहण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली नसल्याचा आरोप तिने आयोजकांवर लावला आहे. शिवाय दुसऱ्या दिवशीच शूटिंग असल्याने त्याठिकाणी तिला पोहोचणे गरजेचे होते परंतु केवळ अनियोजनामुळे तिला ह्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही सर्व हकीकत आणि यादरम्यान आलेला सर्व वाईट अनुभव भाग्यश्रीने आपल्या फेसबुकवरील व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *