गेल्या वर्षी पुलवामा येथे झालेल्या अतिरेक्यांच्या कारवाईत मेजर विभूती शंकर ढौंडियाल यांना वीरमरण आले होते. मेजर विभूती शहीद झाल्यानंतर त्यांना निरोप देताना पत्नी निकिताने जे धैर्य दाखवले ते पाहून संपूर्ण देश गहिवरून गेलेला पाहायला मिळाला होता. त्यांच्या लग्नाला जेमतेम दहाच महिने झाली होती परंतु या दहा महिन्यातील त्यांच्यातील खरे प्रेम काय होते हे साऱ्या जगाने पाहिले. हेच धैर्य मनाशी बाळगून शहिद मेजर विभूती यांची पत्नी निकिता कौल यांनी आपल्या आयुष्यात आर्मीत जाण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.

शहीद मेजर विभूती यांचीच प्रेरणा घेऊन निकिता यांनी नुकतीच आर्मीची एसएससी ( शॉर्ट सर्व्हिस कमिशन) ही परीक्षा दिली आहे. यासंदर्भात एक इंटरव्ह्यू देखील देण्यात आला. ही परीक्षा जेव्हा त्या पास झाल्या तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावरच राहिला नव्हता. आपला विभू देखील अशीच परीक्षा देऊन पास झाला असेल, त्यानेही अशीच मेहनत घेतली असेल अशी चित्र त्यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली होती. आर्मीत जाऊन एक ऑफिसर बनायची निकिता यांची ईच्छा आता लवकरच पूर्ण होणार असून देशभरातून त्यांचे कौतुक देखील केले जात आहे.
ही प्रेरणा मला शहीद मेजर विभूती यांच्याकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. या परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत देखील घेतली, यासाठी मला एक वर्षाचे ट्रेनींग घ्यायला जायचे आहे असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. माझ्या या निर्णयाचा संपूर्ण देशाला गर्व असेल, माझ्या विभुला गर्व असेल असहा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. निकिता कौल यांनी घेतलेल्या ह्या धाडसी निर्णयाचे करावे तेवढे कौतुक थोडेच, त्यांच्यासाठी एक मानाचा सॅल्युट तर झालाच पाहिजे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *