पुण्यात मेट्रो खाली सापडलेल्या त्या भुयारांबाबत धक्कादायक माहिती येते समोर…अधिकाऱ्यांचा खुलासा

पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गाने मेट्रोचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेट चौकाजवळ खोदाईचे काम चालू असताना जमिनीचा मोठा भाग खाली खचला आणि तिथे ३० मीटर खोल खड्डा पडला. आश्चर्याची बाब म्हणजे त्या खड्ड्यात तब्बल ६ फूट उंच आणि ५७ मीटर लांबीचे भुयार आढळल्याने सर्वत्र इतिहासकालीन भुयार सापडल्याची एकच चर्चा होऊ लागली. त्यानंतर अनेक जाणकार आणि अभ्यासकांनी तिथे हजेरी लावली.

पुण्यातील लोकांना पाणी मिळावे म्हणून पेशव्यांनी थेट कात्रजच्या तलावातून बंदिस्त भुयारद्वारे पाणी आणले हा इतिहास सर्वानाच परिचित आहे. याच निकषावर अनेकांनी ह्या भुयाराचा देखील असाच संबंध जोडत इतिहासकालीन भुयार सापडल्याची वार्ता केली. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या मनात ह्या भुयारविषयी कुतूहल निर्माण झाले. त्याच पार्श्वभूमीवर काही अभ्यासकांनी तिथे जाऊन भुयाराची व्यवस्थित पाहणी केली. भुयाराचे बांधकाम आजही सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. चुना आणि विटा यांचा वापर करून हे भुयार बांधण्यात आले आहे. तर खालील भाग ओलाव्यामुळे दलदलीचा झाल्याचे सांगण्यात येते.
भुयाराच्या भिंतीच्या आतमध्ये साधारण १ व्यासाचे पाईप बसवण्यात आले आहेत. हे पाईप जुन्या काळच्या स्वारगेट जलतरण केंद्रापर्यत गेले असल्याचे त्यांना आढळून आले. पूर्वीच्या स्वारगेट जलतरण तलावासाठी ह्या पाईपमधूनच पाणी पुरवले जात असल्याचे निदर्शनास आले. पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठीच नगरपालिकेने ही आखणी केली होती. ही भुयारे पुरातन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कारण, त्या पाईपवर ISI मार्क असलेले चिन्ह आढळून आले आहे. त्यामुळे साधारण चाळीसच्या दशकात ही भुयारे बांधली गेली असावीत असे या अभ्यासकांनी सांगितले आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *