पुण्यात दाखवल्या गेलेल्या चित्रपटाचे दृश्य पाहून प्रेक्षक पडले बेशुद्ध …पहा ब्रिटिशांनी पुढे काय केले ..

कलामहर्षी म्हणून ‘बाबुराव पेंटर’ यांचे नाव प्रचलित आहे. ३ जून १८९० साली कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. वडील सुतारकाम आणि लोहारकाम करत असल्याने कलेची आवड निर्माण झाली. चित्रकला, शिल्पकला यासोबतच चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. कोल्हापूर येथील एक अष्टपैलू कलाकार म्हणून नाव लौकिक केले. गंधर्व नाटक कंपनीची अनेक नाटके त्यांनी रंगवली आणि आपली ओळख निर्माण केली. १ डिसेंम्बर १९१८ साली “महाराष्ट्र फिल्म कंपनी” स्थापन करून अनेक दिग्गज कलावंत घडवण्याचे कार्य त्यांनी केले. ७ फेब्रुवारी १९२० रोजी “सैरंध्री” हा स्रीपात्र असलेला पहिलाच चित्रपट पुण्यातील आर्यन थेटर मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

चित्रपटातील भीम आणि किचक यांच्यातील द्वंद्वव युद्धाची दृश्ये पाहून प्रेक्षक बेशुद्ध झाले होते, इतके ते चित्रीकरण जिवंत आणि प्रभावी झाले होते. आणि याचमुळे ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९२५ साली ‘सावकारी पाश’ चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करून पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान मिळवला. यानंतर ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी ‘ अग्रगण्य ठरत भक्त प्रल्हाद, वत्सलाहरन, कल्याण खजिना , सती पद्मिनी, सिंहगड यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली. यापैकी “सिंहगड” चित्रपट खास ठरला याचे कारण देखील तसेच होते. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी मुंबईत अलोट गर्दीला सामोरे जावे लागले होते. ही अलोट गर्दी पाहता सरकारने “करमणूक कर ” लागू करण्यास सुरुवात केली. प्रथमच चित्रपटाचे १०×२० भित्तिचित्र तयार केल्याने हे देखील याचे आकर्षण ठरले होते. तेव्हापासून भित्तिचित्राचे ‘जनक ‘ म्हणून बाबुराव पेंटर यांचेच नाव घेतले जाते.
६ नोव्हेंबर १९२२ रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीला आग लागली परंतु यातूनही सावरत त्यांनी नव्याने कामास सुरुवात केली. परंतु काही वर्षे लोटली आणि सहकाऱ्यांच्या मतभेदला सामोरे जावे लागले. यामुळे कंपनी कायमची बंद पडली. वयाच्या साठीनंतर म्हणजेच १६ जानेवारी १९५४ रोजी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’ यांच्या नावे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *