“पुढचं पाऊल” मालिकेतील अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्या पत्नी आहेत या सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री …

” पुढचं पाऊल” ही स्टार प्रवाह वरील गाजलेली मालिका. या मालिकेत अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी “यशवंत सरदेशमुख ” यांची भूमिका उत्कृष्ट साकारली होती. श्रीरंग देशमुख यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर तर पुढील शिक्षण रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी टीव्ही मालिकेसोबतच नाटकांतदेखील अभिनय साकारला आहे.

“ही ,अविष्कार” ही त्यांनी साकारलेली नाटके आहेत. सतरंगी रे, अ पेइंग घोस्ट, सिटीझन यांसारख्या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. श्रीरंग देशमुख यांच्या पत्नीचे नाव सीमा देशमुख.

सीमा देशमुख या प्रसिद्ध मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहेत.सहज सुंदर अभिनय ही त्यांची खासियत . झी युवा वरील “देवा शपथ ” या मालिकेत त्यांनी सुरेख भूमिका साकारली आहे. “एका लग्नाची दुसरी गोष्ट” या झी वाहिनीच्या गाजलेल्या मालिकेत त्या झळकल्या. “द पाथ” या शॉर्ट फिल्मचाही त्या एक भाग बनल्या.

“अलिबाब आणि चाळिशीतले चोर”, ऑल द बेस्ट, जागो मोहन प्यारे हे त्यांचे नाटकही तुफान गाजले. उचला रे उचला,बदाम राणी गुलाम चोर, तुझं तू माझं मी , टाइम प्लिज तसेच स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी यांच्या मला काहीच प्रॉब्लेम नाही आशा अनेक चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला आहे. एवढेच नव्हे तर अनेक रंगमंचावर उत्कृष्ट निवेदिका म्हणूनही त्या ओळखल्या जातात.

श्रीरंग आणि सीमा देशमुख यांना रोहन नावाचा मुलगा आहे. रोहनने रामणारायन रुईया महाविद्यालयातुन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. रोहनला संगीताची आवड आहे तसेच तो उत्तम हार्मोनियम वादक देखील आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *