पिवळ्या रंगाच्या साडीतील ही महिला अधिकारी सगळीकडे चर्चेत…मीडियावर पसरल्या जात आहेत “या” अफवा पहा कोण आहे हि महिला

सध्या निवडणुकीची धामधूम सगळीकडे पाहायला मिळत आहे काल रविवारी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्याआधी पाचव्या टप्प्यातील मतदाना दरम्यान सोशल मीडियावर पिवळ्या साडीतील एक महिला अधिकारी चांगलीच चर्चेत आली. ही महिला अधिकारी ज्या मतदान केंद्रावर कार्यरत होती तिथे १००% मतदान झाले असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. नलिनी सिंह असे नाव असलेल्या ह्या महिला अधिकारी ” मिसेस जयपूर” असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे ही महिला अधिकारी या अफवांचे खंडन करत त्यागोष्टींचा पाठपुरावा केला आहे. “त्यामुळे ही महिला अधिकारी नेमकी कोण आणि ती ज्या मतदान केंद्रावर आपले कर्तव्य बजावत होती तिथे खरंच १००% मतदान झाले आहे का? …त्याबाबत अधिक जाणून घेऊयात”

उत्तरप्रदेशातील लखनौयेथील नगराम निवडणूक केंद्रावर ही महिला अधिकारी आपले कर्तव्य बजावत होती त्यादरम्यान एका पत्रकाराने तिचा ईव्हीएम मशीन घेऊन जात असतानाचे फोटो आपल्या कॅमरेऱ्यात टिपले आणि प्रसारमाध्यमात व्हायरल केले. त्यामुळे ही महिला अधिकारी चर्चेत येऊ लागली. ती कार्यरत असलेल्या केंद्रावर १००% मतदान झाले असल्याचे मेसेज देखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले . या महिला अधिकाऱ्याचे खरे नाव आहे “रिना द्विवेदी” . रिना द्विवेदी या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे. त्या ज्या मतदान केंद्रावर आपले कर्तव्य बजावत होत्या तेथे ७०% मतदान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे .
या पिवळ्या साडीतील महिला अधिकाऱ्यांच्या फोटोनंतर सोशल मीडियावर निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली महिला अधिकारी अश्याच पद्धतीने प्रकाशझोतात आली आहे. तिने परिधान केलेला तो निळा ड्रेस देखील सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *