पाल अंगावर पडली की लगेचच अंघोळ का करावी? ….यामागे आहे ” हे” शास्त्रीय कारण.

पाल तसा किळसवाणा प्राणी. किचनमध्ये तर ही पाल दिसली तरी महिलावर्गात मोठी घाबरगुंडी उडते. तसा हा प्राणी विषारी म्हणूनच समजला जातो. कुठल्याही उघड्या अन्न पदार्थात या पडू नये हाच यामागचा उद्देश मानला जातो. परंतु पाल सहसा अंगावर पडत नाही पडलीच तर ती शुभ- अशुभ मानली जाते, हा एक जुनाट समजुतीचाच एक प्रकार मानावा लागेल. पूर्वीची मंडळी पाल अंगावर पडली की लगेचच अंघोळ करायचे . आताची पिढी याला जुनाट रूढी परंपरा मानत असली तरी यामागे शास्त्रीय कारण देखील सांगितले जात आहे. काही संशोधनानुसार असे निदर्शनास आले आहे की, पाल हा विषारी प्राणी आहे.
स्वसंरक्षणासाठी पाल आपल्या शरीरावर ‘ युरिक ऍसिड ‘ नावाचा पदार्थ सोडते. हा पदार्थ तसेही विषारी पदार्थ म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे पाल शरीरावर पडताच तो पदार्थ ती दुसऱ्यांच्या शरीरावर सोडते. हा घटक शरीरातील त्वचेद्वारे आत जाऊन त्वचा विकार होण्याचा संशय बळावतो. यासोबतच या विषारी घटकामुळे इतरही आजारांना बळी पडण्याआधी ताबडतोब अंघोळ करणे आवश्यक असते. म्हणूनच या कारणासाठी तरी किमान ज्याठिकाणी पाल पडली असेल तो भाग स्वछ करणे गरजेचे आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *